शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

‘स्टार’ अनफिट

By admin | Published: November 14, 2014 12:47 AM

शहरवासीयांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी महापालिकेच्या स्टार बसची आहे, परंतु वंश इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या (व्हीएनआयएल) या स्टार बसेस अनफिट असल्याचे प्रादेशिक परिवहन

आरटीओने केल्या सहा बसेस जप्त : प्रवाशांची गैरसोयनागपूर : शहरवासीयांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी महापालिकेच्या स्टार बसची आहे, परंतु वंश इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या (व्हीएनआयएल) या स्टार बसेस अनफिट असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (शहर) तपासणीत गुरुवारी आढळून आले. आज पहिल्याच दिवशी सहा बसेस जप्त केल्या असून १२ बसेसला नोटीस बजावली आहे. व्हीएनआयएल या कंपनीच्या स्वत:च्या २३० तर जेएनयूआरएमच्या २४० बसेस आहेत. एकूण ४७० बसेसपैकी सुमारे दोनशेवर बसेस कार्यरत आहे. उर्वरित बसेस बंद आहेत. सूत्रानुसार, ज्या बसेस प्रवाशांना घेऊन रस्त्यावर धावत आहेत त्यातील ४० टक्के बसेसना आरटीओचे फिटनेस सर्टिफिकेटच नाही. अशा बसेस प्रवाशांसोबतच नागरिकांसाठीही धोकादायक ठरत आहे. आरटीओ कार्यालयाला आलेल्या तक्रारीवरून आजपासून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली. आरटीओने आज पकडलेल्या सर्वच बसेसला फिटनेस सर्टिफिकेट नव्हते. यातील एका बसमध्ये तर पायदानवर खड्डा होता. यामुळे कधीही धोका होण्याची शक्यता होती. इतर बसेसमध्ये ब्रेक, लाईट्स, आसन व्यवस्था, टायर आदी मुख्य समस्या होत्या. आरटीओच्या या विशेष मोहिमेमुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. प्रवाशांना बराच वेळपर्यंत दुसऱ्या बसेसची प्रतीक्षा करावी लागली. आरटीओची ही कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) सर्जेराव शेळके यांच्या मार्गदर्शनात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.(प्रतिनिधी)