नागपूर : शहरातील रिझर्व बँक चौकात आज (दि. ५) सकाळी सवा ९ च्या सुमारास स्टारबसने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या बाजूला उभी करून सर्व प्रवाशांना खाली उतरवल्याने मोठी दुर्घटना टळली. महत्वाचे म्हणजे, गेल्या दोन महिन्यात तिसऱ्यांदा स्टार बसला आग लागल्याची घटना समोर आली असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आज सकाळी ९ वाजता मोरभवन येथून ही स्टारबस खापरखेडाकडे निघाली. दरम्यान, रिझर्व बँक चौक परिसरनजीक असताना बसच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाचा लक्षात आले. यावेळी बसमध्ये जवळपास ३५ प्रवासी होते. चालकाचे प्रसंगावधान राखत वेळीच बस बाजूल उभी करत प्रवाशांना बाहेर काढले.
दरम्यान, धूरासोबत आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या व पाहता-पाहता मोठे संपूर्ण बसने पेट घेतला. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ताफ्याने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने जीवितहानी टळली पण, या घटनेत स्टारबस पूर्णत: जळून खाक झाली.
गेल्या काही दिवसांपासून तापमानवाढीमुळे वाहनांना आग लागण्याच्या घटना समोर येत आहेत. नागपुरात बसला आग लागण्याची जवळपास ४० दिवसातील ही तिसरी होय. गेल्या काही दिवसांपासून तापमानवाढीमुळे वाहनांना आग लागण्याच्या घटना समोर येत आहेत. नागपुरात बसला आग लागण्याची दोन महिन्यातील ही तिसरी होय. यावरून या वाहनांच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात येत असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.