शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

औद्योगिक वसाहतींतील सर्व उद्योग सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 12:25 AM

कोरोना विषाणूच्या संकटामुळे काही कालावधीसाठी थांबविण्यात आलेले उद्योग सुरू करण्यात यावे. नागपूर परिक्षेत्रातील बुटीबोरी, हिंगणा, कळमेश्वर या औद्योगिक वसाहतींतील उद्योग पुन्हा सुरू करून उत्पादन निर्मिती करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज बुधवारी येथे दिले.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना विषाणूच्या संकटामुळे काही कालावधीसाठी थांबविण्यात आलेले उद्योग सुरू करण्यात यावे. नागपूर परिक्षेत्रातील बुटीबोरी, हिंगणा, कळमेश्वर या औद्योगिक वसाहतींतील उद्योग पुन्हा सुरू करून उत्पादन निर्मिती करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज बुधवारी येथे दिले.लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर उद्योग क्षेत्र, आरोग्य विभाग तसेच संबंधित विभागांना येणाºया अडीअडचणी जाणून घेण्यासाठी पालकमंत्री राऊत यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डी.एम. पंचभाई आदी यावेळी उपस्थित होते.आगामी पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता शहरातील नागनदीसह सर्व सांडपाणी वाहून नेणारे नाले तुंबणार नाहीत, यासाठी साफसफाईची कामे सुरू करण्यात यावी. आरोग्य विभागाने स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे व साथीचे आजार उद्भवणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश यावेळी दिले. कोराना विषाणूच्या प्रसाराबाबत सर्तकता बाळगताना जनतेमध्ये जागृती करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. अलगीकरण करून वाढत असलेल्या कोरोना संशयित रुग्णांसाठी पर्यायी व्यवस्था करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिलेत.जीवनावश्यक वस्तूंची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही व किमतीवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.

महाराजबागसाठी अनुदानाचा प्रस्ताव सादर करा‘लॉकडाऊन’मुळे महाराजबाग प्राणिसंग्रहालय बंद आहे. येथील प्राण्यांच्या सुरक्षा व आरोग्यासाठी तसेच त्यांची सुव्यवस्था ठेवण्यासाठी अनुदानाची निकड आहे. याबाबतचा प्रस्ताव पंजाबराव कृषी विद्यापीठामार्फत सादर करावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. येथील प्राण्यांसाठी ‘दत्तक योजना’ राबविण्यात येत असून यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. त्याला प्रतिसाद मिळत असल्याचे पंचभाई यांनी सांगितले.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतMIDCएमआयडीसी