लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरसह विदर्भातून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी नागपुरातून गोव्यासाठी थेट रेल्वेगाडी सुरु करा, अशी मागणी विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या बैठकीत उपस्थित सदस्यांनी केली.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात गुरुवारी सदस्यांच्या सुचना ऐकण्यासाठी विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या १५४ व्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार होते. बैठकीत सदस्यांनी नागपूर ते रायबरेली व्हाया कानपूर मार्गे रेल्वेगाडी सुरु करावी, नागपूर-रतलाम, मुंबई व गोंदियाला जाणाºया गाड्यांना अजनी रेल्वेस्थानकावर थांबा द्यावा, नागपूर ते वर्धा, चंद्रपूर, भंडारा, काटोल, आमला, अमरावतीसाठी फास्ट पॅसेंजर गाडी सुरु करावी, नागपूर-पुणे गरिबरथ एक्स्प्रेसला दररोज चालवावे, गोधणी रेल्वेस्थानकाचा विस्तार करावा, जयपूरसाठी स्पेशल रेल्वेगाडी सुरु करावी तसेच रेल्वेगाड्यात जनरल कोचची संख्या वाढवावी आदी मागण्या केल्या. बैठकीला रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य डॉ. तुळशीराम मार्लावार, संजय धर्माधिकारी, दिलीप सांबरे, महेश लोखंडे, बाबूसिंह गहेरवार, गणेश उगे, कांतिलाल लुनावत, वसंत पालीवाल, गांगेय सराफ, सतीश काले, निलेश खरबडे, अजय दुबे आणि झोनल रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीचे सदस्य बसंत कुमार शुक्ला उपस्थित होते.
नागपूरवरून गोव्यासाठी थेट रेल्वेगाडी सुरु करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 11:42 PM
नागपूरसह विदर्भातून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी नागपुरातून गोव्यासाठी थेट रेल्वेगाडी सुरु करा, अशी मागणी विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या बैठकीत उपस्थित सदस्यांनी केली.
ठळक मुद्दे‘डीआरयुसीसी’ सदस्यांची मागणी : रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीची बैठक