शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
2
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
3
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
4
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
5
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
6
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
7
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
8
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
9
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
10
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
11
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
12
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
13
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
14
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान
15
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
16
अफवेच्या तणावावर ‘थेरपी’ मुंबई विमानतळावर ‘पेट मी’ अनोखा उपक्रम 
17
नेत्यांची पावले आंतरवालीत, संभाजीराजेंसह शिंदेसेनेच्या नेत्यांनी घेतली जरांगे यांची भेट
18
...तर हर्षवर्धन पाटील यांची चौकशी करू : मुरलीधर मोहोळ
19
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
20
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!

गोवंश गोवर्धन सेवा केंद्र सुरू करा; २५ लाखापर्यंत अनुदान घ्या; पात्रताधारकांना संधी

By गणेश हुड | Published: July 08, 2023 5:15 PM

राज्यातील ३२४ तालुक्यात योजना राबविणार 

नागपूर : दुग्धोत्पादन, शेती काम, पशु-पैदाशीस, ओझी वाहण्याच्या कामास उपयुक्त असलेल्या व नसलेल्या गायी, वळू, बैल तसेच् वय झालेले गोवंश यांचा सांभाळ करणाऱ्या गोशाळा,सेवा केंद्रांसाठी  राज्य शासन गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही नवीन योजना राबवणार आहे. या योजनेंतर्गत  १५ ते २५ लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे. राज्यातील ३२४ तालुक्यात ही योजना राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गोशाळांची निवड  केली जाणार आहे. निवड झालेल्या गोशाळांना पशुधनाच्या संख्येनुसार १५  ते २४ लाखापर्यंतचे अनुदान मिळणार आहे. सुधारित गोवंश गोवर्धन सेवा केंद्र या योजनेसाठी पात्र गोशाळांकडून नव्याने अर्ज मागविण्यात आले आहेत. या अनुदानाच्या पात्रतेसाठी अटी व शर्ती शासनाने ठारविल्या आहेत.  त्यानुसार पात्र गोशाळांनी त्यांच्या तालुक्यातील पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग येथे १९ जुलै २०२३  पर्यंत अर्ज करावे. व अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय किंवा तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाच्या सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन अथवा पशुधन विकास अधिकारी (वि) याच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. नितीन फुके यांनी केले आहे.

लाभार्थी निवडीसाठी अटी व शर्ती

- संस्था धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असावी.- संस्थेचे मागील तीन वर्षाचे लेखापरीक्षण झालेले असावे. -संस्थेला गोवंश संगोपनाचा कमीत कमी तीन वर्षांचा अनुभव असावा.- केंद्रावरील पशुधनास आवश्यक वैरण , चारा उत्पादनासाठी व पशुधन संगोपनासाठी संस्थेकडे स्वतःच्या मालकीची अथवा ३० वर्षांच्या नोंदणीकृत भाडेपट्ट्यावर किमान ५ एकर जमीन असावी,- संस्थेकडे एअनुदानाच्या कमीत कमी १० टक्के खेळते भागभांडवल असावे.- आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यासोबत करारनामा करणे बंधनकारक राहील. - संस्थेचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असावे.

टॅग्स :Governmentसरकारnagpurनागपूर