कामठी : शासनाच्या वतीने कामठी येथे काेविड सेंटर सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या वतीने तहसीलदार अरविंद हिंगे यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. कामठी शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, अनेक गावात दरराेज काेराेना रुग्ण आढळून येत आहेत. या रुग्णांना शासनातर्फे गृहविलगीकरण करण्यात येत असल्यामुळे घरातील अख्खे कुटुंबीय काेराेना पाॅझिटिव्ह हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काेराेनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी तालुकास्तरावर कामठी येथे काेविड सेंटर सुरू करून तिथे रुग्णांना विलगीकरण करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. बरिएमंच्या पदाधिकाऱ्यांनी नायब तहसीलदार आर.टी उके यांच्याकडे निवेदन साेपविले. यावेळी मंचचे जिल्हा अध्यक्ष अजय कदम, शहराध्यक्ष दीपंकर गणवीर, नगरसेविका स्नेहलता गजभिये, उदास बनसोड, मनीष मेंढे, सुभाष सोमकुवर, मनोहर गणवीर, निकेश डोंगरे, विक्रांत गजभिये, वसीम अख्तर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित हाेते.
कामठीत काेविड सेंटर सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 4:10 AM