शहरं
Join us  
Trending Stories
1
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
2
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
3
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
4
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
5
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
6
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
7
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
8
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
9
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
10
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
11
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
12
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
13
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंत आजची सोन्याची किंमत
15
"इस्लाम पर इल्जाम लगा रही हो, माफी मांगो...!"; पश्तून तरुणीच्या प्रश्नावर झाकीर नाईक भडकला
16
IND vs SA FINAL : पंतचा मास्टरप्लॅन! ३० चेंडूत ३० धावा हव्या असताना केलं 'नाटक', रोहितचा मोठा खुलासा
17
धक्कादायक! ६ वर्षे शिक्षिका शाळेत गेलीच नाही, तरीही मिळत होता महिन्याला पगार, कारण...
18
"वर्ल्ड कपची ट्रॉफी आली लवकरच ती पर्मनंट ट्रॉफी येणार...", कठीण प्रश्नावर 'सूर्या'ची जोरदार 'बॅटिंग'
19
दत्ता भरणेंविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! इंदापुरात जयंत पाटलांनी केली घोषणा
20
BSNL कडून ग्राहकांना मोठा दिलासा; स्पॅम कॉल्स टाळण्यासाठी नवीन फीचर लाँच 

मानकापूर रेल्वे फाटक सुरू करा

By admin | Published: January 12, 2015 1:01 AM

राष्ट्रीय महामार्गावरील मानकापूर रेल्वे क्रॉसिंग उड्डाण पुलाखालील रेल्वे फाटक क्रमांक २९४ येत्या २४ तासात सुरू करा, असे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी

नागरिकांच्या आंदोलनाला यश : गडकरींचे अधिकाऱ्यांना निर्देश नागपूर : राष्ट्रीय महामार्गावरील मानकापूर रेल्वे क्रॉसिंग उड्डाण पुलाखालील रेल्वे फाटक क्रमांक २९४ येत्या २४ तासात सुरू करा, असे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एस.के. सूद आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक ओ.पी. सिंग यांना दिले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, आ. सुधाकर देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. प्रा. अनिल सोले, चंद्रपूरचे आमदार नाना श्यामकुळे, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, मनपा पक्षनेते दयाशंकर तिवारी, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष नरेंद्र बोरकर, भाजपा शहर अध्यक्ष गिरीश व्यास, संजय बंगाले प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या उद्देशाने मानकापूर रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. परंतु पूल झाल्यापासून येथील रेल्वे क्रॉसिंगवरील फाटक वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. त्यामुळे फाटकाच्या पलीकडील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. फाटकाच्या पलीकडील परिसरात जवळपास ३० हजारावर नागरिक राहतात. या परिसरात झिंगाबाई टाकळी व मानकापूर हे मुख्य बाजाराचे ठिकाण असून, पलीकडील नागरिकांना लहानसहान गोष्टीसाठी अलीकडे यावे लागते. मानकापूर स्मशानभूमी सुद्धा फाटकाच्या अलीकडे आहे. या परिसरातील नागरिकांना कुठल्याही गोष्टीसाठी झिंगाबाई टाकळी किंवा मानकापूरला यायचे असेल तर किमान दोन किलोमीटरचा फेरा मारून यावे लागते. त्यामुळे पलीकडील नागरिकांना अलीकडे येण्यासाठी काही पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी लावून धरली होती. तसेच पर्यायी व्यवस्था होईपर्यंत रेल्वे फाटक सुरू ठेवावे, अशी मागणीसुद्धा केली होती. परंतु रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मात्र त्यांची मागणी धुडकावून लावली. मानकापूर रेल्वे क्रॉसिंग आंदोलन समितीची स्थापना केली आणि या समितीमार्फत गेल्या चार महिन्यांपासून येथील शेकडो महिला-पुरुष यांचे साखळी उपोषणाद्वारे आंदोलन सुरू होते. या आंदोलनादरम्यान त्यांनी वेळोवेळी अर्ज विनंती व निवेदन सादर केले. रविवारी दुपारी १२ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या उपोषण मंडपाला भेट दिली. नागरिकांशी संवाद साधला. तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा करून फाटक सुरू करण्यासंदर्भात २४ तासात निर्णय घेण्याचे निर्देश दिले. गडकरींच्या निर्देशानंतर आणि पालकमंत्र्यांच्या आवाहनानंतर नागरिकांनी आपले आंदोलन मागे घेतले. (प्रतिनिधी)मुजोर अधिकाऱ्याला धडा शिकवा आंदोलनादरम्यान येथील नागरिक अनेकदा रेल्वेच्या स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटले. परंतु रेल्वेचे अधिकारी त्यांच्याशी असभ्य वागणूक करीत असल्याची तक्रार अनेक नागरिकांनी यावेळी केली. त्या पार्श्वभूमीवर मुजोर रेल्वे अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल करा. दलित-मागासवर्गीयांना त्रास दिला असेल तर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करा, असे आवाहनही गडकरी यांनी यावेळी केले. तसेच सरकार बदलले आहे. त्यामुळे अधिकारी ऐकत नसतील तर त्यांना अद्दल घडवावी, असा इशारासुद्धा त्यांनी यावेळी दिला. उड्डाणपूल बांधणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणार यावेळी मानकापूर उड्डाण पुलाची पाहणी केल्यानंतर उड्डाणपुलाचे डिझाईन मुळातच चुकीचे आहे. नाल्यामध्ये कॉलम उभे करण्यात आले आहेत. उड्डाणपुलाच्या चुकीच्या डिझाईनमुळे झिंगाबाई टाकळीत अनेक अपघात घडले आहेत. त्यामुळे या उड्डाणपुलाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराचा परवाना रद्द करून त्याला काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश देण्यात येतील. तसेच यापुढे त्या कंपनीला राष्ट्रीय महामार्गाचे कुठलेही काम मिळणार नाही अशी व्यवस्था केली जाईल, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.