नागपूर : कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा व महाविद्यालये मागील दीड वर्षापासून बंद असून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. आज फक्त ऑनलाईन शिक्षणाच्या भरवशावर राहिल्यास अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती असून भावी पिढीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शाळा तात्काळ सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक महासंघाकडून मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना करण्यात आली. लग्न समारंभ, वाढदिवस, सर्वच पक्षाचे राजकीय व सामाजिक कार्यक्रम सुरू आहे. देशातील इतर राज्यात शाळा सुरू झालेल्या आहे. आपल्या राज्यात कोरोना महामारी चा प्रभाव कमी झाला तरी शाळा सुरू करण्यात याव्यात. यावेळी संघटनेचे मार्गदर्शक पुरुषोत्तम पंचभाई, सचिव बाळा आगलावे, जयघोष वाल्देकर, संजय लांजेवार, जयप्रकाश तवले, जयवंत इंगोले, यशवंत जनबंधू, गणेश झाडे आदी उपस्थित होते.
शाळा व महाविद्यालय तात्काळ सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:08 AM