लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या शिक्षक आघाडीतर्फे शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी संविधान चौक येथे निदर्शने करण्यात आली. राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया लगेच सुरू करण्यात यावी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी इत्यादी मागण्यांसाठी हे आंदोलन होते. राज्य शासनाच्या शिक्षणसंबंधी धोरणाबाबत यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली.
संविधान चौकात झालेल्या निदर्शनात शिक्षक आघाडीच्या प्रदेश संयोजिका डॉ. कल्पना पांडे, आ. नागो गाणार, भाजपचे संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, माजी आमदार अनिल सोले, रजनीकांत बोन्द्रे, अनिल शिवणकर प्रामुख्याने उपस्थित होते. वरिष्ठ व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाच्या तारखा तात्काळ घोषित करण्यात याव्या, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशत: अनुदानित शाळांमध्ये नियुक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे बंद केलेले भविष्य निर्वाह निधीचे खाते तत्काळ सुरू करण्यात यावे या मागण्यादेखील लावून धरण्यात आल्या.
शिक्षक आघाडीच्या इतर मागण्या
- वेतनास विलंब करणा-या संबंधित अधिका-यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे.
५) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची भविष्य निर्वाह निधी व वैद्यकीय प्रतिपूर्तीची रक्कम लगेच देण्यात यावी.
६) शिक्षण सेवक व शिक्षकेत्तर सेवक यांचे मानधन सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वाढविण्यात यावे.