शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

दिल्लीसाठी थेट रेल्वेगाडी सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 10:02 PM

नागपुरातून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून नागपूरवरून दिल्लीसाठी थेट रेल्वेगाडी सुरू करावी, अशी सूचना रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या सदस्यांनी ‘डीआरएम’ कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत केली.

ठळक मुद्दे‘डीआरयुसीसी’ सदस्यांची सूचना : रेल्वेगाड्यातील चोरीच्या घटनांवर अंकुश लावण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून नागपूरवरून दिल्लीसाठी थेट रेल्वेगाडी सुरू करावी, अशी सूचना रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या सदस्यांनी ‘डीआरएम’ कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत केली.रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीची १५३ वी बैठक विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली. अध्यक्षस्थानी ‘डीआरएम’ सोमेश कुमार श्रीवास्तव होते. बैठकीत सदस्यांनी दिल्लीसाठी थेट रेल्वेगाडी सुरू करावी, सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये एसी फर्स्टचा कोच लावावा, रेल्वेगाड्यांमध्ये प्रवासी सुरक्षित नसून चोरीच्या घटना वाढल्याने रेल्वेगाड्यात आरपीएफची संख्या वाढवावी, रेल्वेगाडीत प्रवास करणाऱ्या डॉक्टरांचे नाव व मोबाईल क्रमांक रिझर्व्हेशनच्या वेळी लिहावा, आरक्षित कोचमध्ये चार्ट लावताना त्यावर टीटीई व कंडक्टरचे नाव मोबाईल क्रमांकसह समाविष्ट करावे, प्रवासात प्रवाशांना उच्च दर्जाचे भोजन पुरवून त्यांना भोजनाचे बिल द्यावे, रेल्वेगाडी क्रमांक २२११२ नागपूर-भुसावळ व्हाया इटारसी या गाडीला नियमित करावे, नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसमध्ये गर्दीच्या वेळी तिकीट तपासावे, अमरावती-जबलपूर गाडीला अजनी येथे थांबा द्यावा, धामणगाव रेल्वेस्थानकावर कोच इंडिकेटर बसवावे, धामणगावला व्हीआयपी गेस्ट रुम उपलब्ध करून द्यावी, नागपूर-पुणे एक्स्प्रेसला नियमित करावे आदी सूचना समितीचे सदस्य वसंत पालीवाल, अश्विन अग्रवाल, बाबुसिंग गहेरवाल, बसंत कुमार शुक्ला, डॉ. रवि वानखेडे, रेणुका कोटंबकर, चंद्रमोहन रणधीर, संजय धर्माधिकारी, महेंद्र दर्डा, किरण वैद्य, गगनेश प्रतापसिंग, दिलीप सांबरे आदींनी केल्या. ‘डीआरएम’ सोमेश कुमार श्रीवास्तव यांनी मागील वर्षात विभागात केलेल्या विकासकामांची माहिती दिली. वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक तथा समितीचे सचिव कुश किशोर मिश्र यांनी प्रास्ताविकातून सदस्यांना रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या कार्यपद्धतीविषयी माहिती दिली. बैठकीला अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी उपस्थित होते. आभार सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस. जी. राव यांनी मानले.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर