लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यंदाच्या कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार अभियानातील सर्व कामे ३१ आॅक्टोबरपासून सुरू करण्यात यावीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यानुसार नागपूर विभागातील यंदाच्या सर्व कामांना त्यापूर्वीच सुरू करावे, असे जलसंधारण सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात जलयुक्त शिवार अभियानातील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाºयांकरिता एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त तथा प्रभारी कुलगुरू माफसू अनुप कुमार, नरेगा आयुक्त प्रसाद कोलते, नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, भंडारा जिल्हाधिकारी सुहास दिवसे, गोंदिया जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, वर्धा जिल्हाधिकारी शैलेश नवाल, गडचिरोली जिल्हाधिकारी ए.एस.आर.नायक आणि चंद्रपूर जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जितेंद्र पापळकर, नयना गुंडे तसेच मृद संधारण विभागाचे संचालक मोते, सहसंचालक बोटे, विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त पराग सोमण तसेच पर्यवेक्षीय अधिकारी, कार्यकारी अभियंता, तालुका पातळीवरील जलयुक्त शिवार अभियानातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.एकनाथ डवले म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियान हा शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हाधिकाºयांना या अभियानाचे प्रमुख म्हणून नेमले आहे. अभियानाकरिता जलसंपदा व इतर विभागातील तांत्रिक-अतांत्रिक कर्मचारी यांच्या सेवा आवश्यकतेनुसार अन्य दुसºया विभागात तात्पुरत्या स्वरूपात वळविण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. जलयुक्त शिवार योजनेत गावाचा पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा ताळेबंद महत्त्वाचा आहे. सूक्ष्म पाणलोटनिहाय कामाचा नियोजित आराखड्यात समावेश करावा. त्यासाठी नकाशे उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ढाळीचे बांध बंदिस्ती ही कामे विदर्भ व मराठवाड्यातील निश्चित पावसाच्या भागात घेण्यात यावी. बांधावर लावण्यात येणाºया स्टायलो -मारवेल इत्यादी गवत लावण्याबाबत शेतकºयांना मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी सांगितले....तर सेवानिवृत्त कर्मचाºयांची मदत घ्याजलयुक्त शिवार अभियान राबविताना मनुष्यबळाची कमतरता भासत असल्यास सेवानिवृत्त कर्मचाºयांची मदत घेता येईल. तसेच ‘मागेल त्याला बोडी’ हा उपक्रम ‘मागेल त्याला शेततळे’ या धर्तीवर राबविण्याबाबतही डवले यांनी यावेळी सूचना दिल्या.
‘जलयुक्त शिवार’ची कामे ३१ आॅक्टोबरपर्यंत सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 1:21 AM
यंदाच्या कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार अभियानातील सर्व कामे ३१ आॅक्टोबरपासून सुरू करण्यात यावीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
ठळक मुद्दे एकनाथ डवले : अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण कार्यशाळा