नागपूर : मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प शासनाच्या विचाराधीन आहे. केंद्र शासनाला त्याबाबत विनंती करण्यात आली आहे. यासंदर्भात आर्थिक व तांत्रिक व्यवहार्यता तपासण्याचे काम सुरू असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.रेल्वे मंत्रालयाने स्पॅनिश कंपनीची मुंबई-नागपूर जलदगती रेल्वे प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी नियुक्ती केली आहे. हा प्रकल्प केंद्र शासनाच्या विचाराधीन आहे. मात्र राज्य सरकारला केंद्र शासनाकडून याबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव प्राप्त झाला नसल्याची माहिती रावते यांनी लेखी उत्तरात दिली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे शरद रणपिसे, संजय दत्त आदी सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.
दुधाला हमीभाव मिळण्यासाठी कायदा करणारनागपूर : राज्यातील दूध उत्पादन करणा-या शेतक-यांचे हित जोपासण्यासाठी शुगर प्राईज कंट्रोल अॅक्टच्या धर्तीवर दुधाकरिता कायदा करण्याचे राज्य सरकारच्या विचाराधीन आहे, अशी माहिती दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. दत्तात्रय सावंत व श्रीकांत देशपांडे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. राज्यातील दूध उत्पादन करणा-या शेतक-यांना दूध उत्पादक संस्थांकडून दुधाला वेगवेगळे दर दिले जातात. शासनाने निश्चित केलेले दूध खरेदी दर हे शासन व सहकार क्षेत्राकरिता लागू आहेत. मात्र खासगी क्षेत्राच्या दूध खरेदी व विक्री दरावर शासनाचे नियंत्रण नाही. त्यामुळे खासगी दूध क्षेत्राकडून दूध उत्पादक शेतकºयांना बाजारभावाप्रमाणे दर दिले जातात, अशी माहिती जानकर यांनी दिली.परिवहन महामंडळाच्या ताफ्यात १५०० बसेसनागपूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळास १५३ शिवशाही वातानुकूलित बसेस प्राप्त झालेल्या आहेत. लवकरच १५०० बसेस भाडेतत्त्वावर प्राप्त होतील, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. अनंत गाडगीळ यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.पहिल्या टप्प्यात ७०० बसेसचा पुरवठा करण्यासाठी सात निविदाकारांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच राज्य परिवहन महामंडळाने स्वमालकीच्या ५०० बसेस घेण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. परिवहन महामंडळाच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने शिवशाही बसेस दाखल होत असल्याची माहिती रावते यांनी लेखी उत्तरात दिली.