शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

पूर्व नागपुरात अत्याधुनिक रुग्णालय बनणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर ः स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या पुनापूर भागात अत्याधुनिक रुग्णालय बनविण्यात येणार आहे. यासाठी साडेपाच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर ः स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या पुनापूर भागात अत्याधुनिक रुग्णालय बनविण्यात येणार आहे. यासाठी साडेपाच एकरची जागा राखीव ठेवण्यात आली आहे. येथील रुग्णालयाकरता अपोलो-लीलावती रुग्णालयाच्या प्रमुखांनी तयारी दाखविली असल्याची माहिती पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी दिली आहे. त्यांनी या भागाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

पारडी-पुनापूर-भरतवाडा येथे स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अंतर्गत हाउसिंगच्या एकूण सात इमारतीपैकी तीन इमारतीचा कामाची सुरुवात झाली आहे. सात इमारतींमध्ये ६७२ फ्लॅट व ४८ दुकानांची गाळे राहणार आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत ज्यांची लहान घरे रस्त्याच्या कामात जात असतील त्यांना हे फ्लॅट मिळणार आहेत, असे खोपडे यांनी सांगितले. या निरीक्षण दौऱ्यात लकडगंज झोन सभापती मनीषा अतकरे, नगरसेवक दीपक वाडीभस्मे, वैशाली वैद्य, देवेंद्र मेहर, स्मार्ट सिटीचे राजेश दुपारे, राहुल पांडे, संजय मानकर, देवेंद्र बिसेन, अनिल कोडापे, प्रामुख्याने उपस्थित होते.

संथ कामाबाबत नाराजी

पावनगांव येथील जुना पूल नष्ट करून ३० मीटर पुलाच्या कामाची सुरुवात झाली आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत पाण्याची टाकी, नागनदीवर ब्रिज, रस्त्याची कामे, नळाची पाइपलाइन आदी कामे मंदगतीने सुरू असल्याबाबत खोपडे यांनी नाराजी व्यक्त केली असून, गती वाढविण्याचे निर्देश दिले आहेत.