लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शिक्षण मंडळाच्या बाराव्या वर्गाच्या निकालाची घोषणा अद्यापही केलेली नाही. निकालाला होत असलेल्या उशिराबद्दल मुंबई व औरंगाबाद विभागीय कार्यालयातर्फे परीक्षेचे काम पूर्ण झाले नाही, असे सांगण्यात येत आहे.सोमवारी पुणे विभागीय कार्यालयाचे परीक्षेचे काम पूर्ण झाल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच मुंबई व औरंगाबाद विभागीय कार्यालयाचे निकालाचे काम अंतिम टप्प्यावर आहे. बुधवारपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. परीक्षेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी पुणे मुख्यालयात बोर्डाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यात मुंबई व औरंगाबाद विभागीय कार्यालयाच्या परीक्षेच्या कामाचा आढावा घेण्यात आला. मंगळवारी होणाºया बैठकीत निकालाची तारीख घोषित करण्यात येऊ शकते. बोर्ड परीक्षेच्या कामाची गती लक्षात घेता ३० मे अथवा १ जून रोजी निकाल घोषित करण्याचा प्रयत्नात आहे. यासंदर्भात बोर्डाच्या अधिकाºयांशी संपर्क केला असताना, त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. अफवांकडे लक्ष देऊ नकाराज्य शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या १२ वी च्या परीक्षेचे निकाल कधी घोषित होईल, हे स्पष्ट झालेले नाही. तरी सुद्धा सोशल मीडियावर निकालाच्या तारखा व्हायरल झाल्या आहेत. हे बघता शुक्रवारी बोर्डाने एक पत्र काढून पालक व विद्यार्थ्यांना सूचित केले आहे. यात बोर्डाच्या परीक्षेची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर निकालाची तारीख घोषित करण्यात येणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पसरविण्यात येणाऱ्या अफवेवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल अधांतरीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 1:08 AM
राज्य शिक्षण मंडळाच्या बाराव्या वर्गाच्या निकालाची घोषणा अद्यापही केलेली नाही. निकालाला होत असलेल्या उशिराबद्दल मुंबई व औरंगाबाद विभागीय कार्यालयातर्फे परीक्षेचे काम पूर्ण झाले नाही, असे सांगण्यात येत आहे.
ठळक मुद्देमुंबई व औरंगाबाद विभागीय कार्यालयाचे परीक्षेचे काम अंतिम टप्प्यात