शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

प्रवाशांची विमानतळावरच तपासणी, राज्य सरकार सतर्क; मास्कला वाढली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 4:34 AM

देशातून विमानाने आलेल्या प्रवाशांची तपासणी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळांवरच करून आवश्यकतेनुसार त्यांना विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे.

नागपूर/मुंबई : कोरोनाबाधित देशातून विमानाने आलेल्या प्रवाशांची तपासणी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळांवरच करून आवश्यकतेनुसार त्यांना विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे. नागपुरात कोरोनाचे तीन संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे ‘एन-९५’ मास्कची मागणी वाढली आहे. पूर्वी नागपुरात जिथे दिवसभरात २०० ते ५०० मास्कची विक्री व्हायची ती संख्या आता तीन हजाराच्या घरात गेली आहे. एका मास्कची किंमत १५० रुपये आहे. नागपूर विभागांतर्गत आरोग्य विभागाकडून वर्धा, गोंदिया, गडचिरोली, भंडारा व चंद्रपूर येथे प्रत्येकी एक आयसोलेशन वॉर्ड सुरू करण्यात आला आहे.मीरारोडची सोनाली भारतात परतलीजपानजवळील एका जहाजावर अडकलेल्या मुंबईतील मीरा रोडच्या सोनाली ठक्करसह १८ भारतीयांना दिल्ली येथे तीन दिवसांपूर्वी आणण्यात आले. त्यांना एका रु ग्णालयात ठेवले असून १४ दिवसांनंतर तिला घरी पाठवले जाणार असल्याची माहिती सोनालीच्या वडिलांनी दिली. चीनच्या एका शिपिंग कंपनीत सुरक्षा अधिकारी म्हणून काम करणारी सोनाली जहाजाने चीन येथून जपानला जात असताना, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून जपानने जहाज समुद्रातच रोखले. सोनाली १८ दिवस त्या जहाजावर एका केबिनमध्ये बंदिस्त होती. मदतीसाठी तिने कुटुंबियांशी संपर्क साधला होता.राज्य शासनाची हेल्पलाईनराज्य शसनाच्या आरोग्य विभागाने हेल्पलाईन सुरू केली आहे. यात राज्य नियंत्रण कक्ष ०२०/२६१२७३९४ व टोल फ्री क्रमांक १०४ या क्रमाकांवर संपर्क केल्यास कोणत्या रुग्णालयात विलगीकरण कक्ष आहेत,पर्यटन केले असल्यास कोणती काळजी घ्यावी, शंकांचे निरसनतज्ज्ञांच्या मदतीने करण्यातयेत आहे.>१४९ प्रवासी करोना निगेटिव्हचीन, हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, द कोरिया,जपान, नेपाळ,इंडोनेशिया, व्हिएतनाम, मलेशिया,इराण आणि इटली या १२ देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येत आहे. राज्यात बाधित भागातून आतापर्यंत ४०१ प्रवासी आले आहेत. विलगीकरण कक्षात १५२ जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी १४९ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन आय व्ही पुणे यांनी दिला आहे. इतर ३ जणांचे अहवाल आज प्राप्त होतील. आजवर भरती झालेल्या १५२ प्रवाशांपैकी १४६ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.