शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

राज्य सरकार विदर्भ व मराठवाड्याचा विकास निधी पळवत आहे : देवेंद्र फडणवीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 9:47 PM

Devendra Fadnavis राज्य सरकारकडून विदर्भ व मराठवाड्याचा विकास निधी पळवणे सुरू झाले आहे. वैधानिक विकास मंडळ बंद करून त्यांनी आणखी निधी पळवण्याचा मार्ग मोकळा केला आहे. ही मंडळे बंद करून शासनाने विदर्भ व मराठवाड्यातील जनतेचा विश्वासघात केला आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लावला आहे.

ठळक मुद्देशासनाकडून मोगलाईसारखेच निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य सरकारकडून विदर्भ व मराठवाड्याचा विकास निधी पळवणे सुरू झाले आहे. वैधानिक विकास मंडळ बंद करून त्यांनी आणखी निधी पळवण्याचा मार्ग मोकळा केला आहे. ही मंडळे बंद करून शासनाने विदर्भ व मराठवाड्यातील जनतेचा विश्वासघात केला आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लावला आहे. शुक्रवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

महाविकास आघाडी शासनाकडून मागील काही दिवसांपासून सातत्याने जनतेच्या हितावर प्रहार करण्यात येत आहे. ‘लॉकडॉऊन’नंतर जनतेच्या मागे सरकारने उभे राहण्याची गरज होती. मात्र सरकारने जनतेच्या वीज जोडण्या कापण्याचा निर्णय घेतला. सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते मोठमोठे मेळावे घेत आहेत. मात्र कोट्यवधी जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजनावर निर्बंध लावण्यात आले. शासनाकडून अक्षरश: मोगलाईप्रमाणेच निर्णय घेण्यात येत आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात एक अहवाल न्यायालयात आहे त्यावर अजून निर्णय यायचा आहे. आता यावर बोलणे योग्य होणार न्यायालयाचा निर्णय आल्यावर आम्ही भूमिका मांडू, असे त्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीचे नेते जनतेला मूर्ख समजतात का?

अर्थसंकल्पीय अधिवेशनात जनतेशी निगडित मुद्द्यांवर सरकारला घेरण्यासाठी आमची तयारी आहे. वीज बिलाचा मुद्दा तर फारच मोठा आहे. वीज बिल माफीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सत्ता पक्षात राहून विरोधी पक्षाची मजा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या पक्षाचे कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी ठामपणे भूमिका घ्यावी. महाविकास आघाडीचे नेते जनतेला मूर्ख समजतात का, असा सवाल फडणवीस यांनी केला.

राज्यपालांवर टीका करणाऱ्यांनी नियम वाचावेत

विधानसभेच्या अध्यक्षपदावरून राज्यपालांनी सरकारला पत्र लिहिले व त्यावरुन नवा वाद सुरू झाला. ज्यांनी विधानसभेचे नियम वाचले नाही तेच राज्यपालांवर टीका करणारे भाष्य करत आहेत, असा चिमटा फडणवीस यांनी काढला. इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर बोलताना महाराष्ट्र शासनाने त्यांचे कर ‘ट्विट’ करावे, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMediaमाध्यमे