नागपूर : राज्य सरकारने वृक्षलागवडीचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला असून, जंगलक्षेत्र वाढत असल्याचे सांगितले जात आहे; परंतु दुसरीकडे जंगलात अवैध वृक्षतोडही मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची बाब माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. राज्यात पाच वर्षात तब्बल ५ लाख ६१ हजार ४१० वृक्षांची अवैधपणे तोड करण्यात आली.नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी यासंदर्भात माहितीच्या अधिकार अंतर्गत अर्ज केला होता. त्यावर प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने दिलेली माहिती धक्कादायक आहे. २०१३ ते मार्च २०१८ मध्ये ५ लाख ६१ हजार ४१० वृक्ष तोडण्यात आली आहेत. त्यापैकी एकट्या सागवनाची झाडे २ लाख ३४ हजार २१६ इतकी आहेत.>२५ कोटींचे साग चोरीला५ वर्षात ३४ कोटी ५६ लाख ८५ हजार रुपये किमतीची झाडे तोडली. त्यामध्ये २ लाख ३४ हजार २१६ सागवान वृक्षांचा समावेश असून त्याची किंमत २५ कोटी ९५ लाख इतकी आहे.
राज्यात पाच वर्षांत साडेपाच लाखांवर वृक्षांची अवैध तोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 5:16 AM