लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र्रीय जलसंपदा, नदी विकास व गंगा संरक्षण मंत्रालयातर्फे ६ मार्च रोजी वनामती येथे राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.जलप्रदूषणाला आळा घालणे व जलसंवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र्रीय जलसंपदा, नदी विकास व गंगा संरक्षण मंत्रालयातर्फे प्रत्येक वर्षी शालेय, राज्य व राष्ट्रीय स्तरावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी महाराष्ट्र राज्य व दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाच्या शाळांमधील सुमारे ३४ हजार विद्यार्थ्यांनी शालेय चित्रकला स्पर्धेत सहभाग नोंदवला. यातील ५० सर्वोत्कृष्ट चित्रांची निवड ८ व्या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेसाठी केली गेली आहे. या ५० विद्यार्थ्यांना ६ मार्च रोजी धरमपेठ येथील वनामतीमध्ये चित्रकला स्पर्धेसाठी आमंत्रित केले असून यावर्षीच्या चित्रकला स्पर्धेची मूळ संकल्पना ‘पाणी वाचवा, आयुष्य सुरक्षित करा’ ही आहे. या चित्रकला स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ दुपारी ३.३० वाजता होणार असून याप्रसंगी केंद्रीय भूजल मंडळ, मध्यक्षेत्र नागपूरचे प्रादेशिक संचालक पी. के. परचुरे हे अध्यक्षस्थानी राहतील तर महापौर नंदा जिचकार प्रमुख अतिथी असतील.
नागपुरात जलसंवर्धनासाठी आज राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 8:29 PM
केंद्र्रीय जलसंपदा, नदी विकास व गंगा संरक्षण मंत्रालयातर्फे ६ मार्च रोजी वनामती येथे राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे३४ हजार विद्यार्थ्यांचा स्पर्धेत सहभाग