लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या राज्य शिक्षक पुरस्कार मुलाखतींना पुण्यात सुरुवात झाली आहे. १ आॅगस्टपासून सुरू झालेल्या शिक्षकांच्या मुलाखती ९ तारखेपर्यंत चालणार आहेत. दर दिवशी दोन विभागातील विविध जिल्ह्यातील शिक्षकांच्या मुलाखती होतील. प्राथमिक, माध्यमिक, सावित्रीबाई फुले, आदिवासी आणि कला, क्रीडा स्काऊट गाईड आणि अपंग अशा पाच गटात शिक्षक मुलाखती देतील. गेल्या दोन वर्षांपासून राज्य शिक्षक निवड प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने होत आहे. अशा पद्धतीने निवडीचे हे तिसरे वर्ष असून, यावेळी विभाग स्तरावरील निवड प्रक्रिया वगळून थेट राज्य स्तरावर मुलाखती घेतल्या जात आहेत, हे येथे उल्लेखनीय!शिक्षण विभागाकडे सर्व गटातील १२६३ शिक्षकांचे आॅनलाईन अर्ज आले आहेत. त्यात प्राथमिक विभागात ४८५, माध्यमिक विभागात ४९०, आदिवासी विभागात ८६, कला क्रीडा व अपंग शिक्षक ९९ तर सावित्रीबाई फुले पुरस्कारासाठी १०३ अर्ज आले आहेत. राज्यभरातून आलेल्या आॅनलाईन अर्जात प्राथमिक विभागात सर्वाधिक स्पर्धा असून, मुंबई जिल्ह्यातून सर्वाधिक ३३ अर्ज आले आहेत तर सर्वात कमी ३ अर्ज विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातून आले आहेत. माध्यमिक विभागात सर्वाधिक ४३ अर्ज पुण्यातून आले असून, पालघर जिल्ह्यातून एकही अर्ज आलेला नाही.शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया असून, समर्पितवृत्तीने काम करणाºया शिक्षकांमुळेच समाज आणि राष्ट्राचा विकास होतो, अशी शासनाची मान्यता आहे. त्यामुळेच समर्पितवृत्तीने काम करणाºया शिक्षकांचा सन्मान शिक्षकदिनी राज्य शिक्षक पुरस्कार देऊन केला जातो. यापूर्वीचा प्रस्ताव सादर करून निवड समितीद्वारे निवड पद्धतीला फाटा देऊन, गेल्या तीन वर्षांपासून वस्तुनिष्ठ निकषाद्वारे निवड करुन पुरस्कार दिले जात आहेत. आॅनलाईन अर्ज करून पुरस्कारासाठी नामांकन करण्याच्या पद्धतीला शिक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून, दरवर्षी शिक्षक नामांकनात वाढ होत आहे.प्राथमिक गटापासून मुलाखतींना सुरुवात होणार असून, १ आॅगस्टला मुंबई आणि पुणे विभाग, २ आॅगस्टला कोल्हापूर, नाशिक आणि लातूर, ३ आॅगस्टला औरंगाबाद, अमरावती तर ४ आॅगस्टला नागपूर आणि सर्व विभागातील आदिवासी गटातील प्राथमिक शिक्षक मुलाखती देतील. माध्यमिक शिक्षकांच्या मुलाखती ५ आॅगस्टपासून सुरू होणार असून ५ तारखेला मुंबई आणि पुणे, ६ आॅगस्टला नाशिक, कोल्हापूर व औरंगाबाद तर ७ तारखेला लातूर, अमरावती आणि नागपूर विभागाच्या मुलाखती होतील. ८ आॅगस्टला सर्व विभागातील कला, क्रीडा, स्काऊट-गाईड आणि अपंग गटातील शिक्षक मुलाखती देतील. ९ तारखेला निवड प्रक्रियेचा शेवटचा दिवस असून, या दिवशी सावित्रीबाई फुले गटातील सर्व महिला शिक्षिका मुलाखती देतील. पुण्याच्या विद्या प्राधिकरणात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या संचालकांच्या देखरेखीत ही प्रक्रिया पार पाडली जात आहे.पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कारासाठी वेगळी प्रक्रियायापूर्वी राज्य व राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार निवड प्रक्रिया एकत्रितच राबविली जात होती. एकाच प्रक्रियेतून अधिक गुण मिळविणारे शिक्षक राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी पाठविले जात. यावर्षी पहिल्यांदाच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी वेगळी प्रक्रिया पार पडली. प्रत्येक जिल्ह्यातून तीन याप्रमाणे शंभरावर शिक्षकांच्या मुलाखती पुण्यात २५ व २६ जुलैला पार पडल्या. त्यापैकी सहा शिक्षकांची मानांकने केंद्र सरकारकडे ३ आॅगस्टपर्यंत पाठविली जातील.
राज्य शिक्षक पुरस्कारासाठी १२५० शिक्षक स्पर्धेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 11:00 PM
दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या राज्य शिक्षक पुरस्कार मुलाखतींना पुण्यात सुरुवात झाली आहे. १ आॅगस्टपासून सुरू झालेल्या शिक्षकांच्या मुलाखती ९ तारखेपर्यंत चालणार आहेत. दर दिवशी दोन विभागातील विविध जिल्ह्यातील शिक्षकांच्या मुलाखती होतील. प्राथमिक, माध्यमिक, सावित्रीबाई फुले, आदिवासी आणि कला, क्रीडा स्काऊट गाईड आणि अपंग अशा पाच गटात शिक्षक मुलाखती देतील. गेल्या दोन वर्षांपासून राज्य शिक्षक निवड प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने होत आहे. अशा पद्धतीने निवडीचे हे तिसरे वर्ष असून, यावेळी विभाग स्तरावरील निवड प्रक्रिया वगळून थेट राज्य स्तरावर मुलाखती घेतल्या जात आहेत, हे येथे उल्लेखनीय!
ठळक मुद्देपुण्यात निवडप्रक्रिया सुरू : सर्वाधिक अर्ज मुंबई-पुण्यातून