लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंबेडकरी जनतेचे श्रध्दास्थान असलेल्या नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीला स्तूपाच्या उत्तरेकडील प्रवेश व्दारासमोर असलेली भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची ३.८४ एकर जागा उपलब्ध करावी यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे शिफारशीसह प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी आमदार प्रकाश गजभिये यांनी गुरुवारी औचित्याच्या मुद्याव्दारे विधान परिषदेत केली.दीक्षाभूमी येथे दरवर्षी डॉ.बाबासाहेब अांबेडकर जयंती, बुध्द जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन व महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमांना लाखोंच्या संख्येत अनुयायी येत असतात. दीक्षाभूमी स्तूपात जाण्यासाठी चार प्रवेशव्दार आहेत. पूर्व, पश्चिम आणि दक्षिण प्रवेशव्दार अनुयायांना आत व बाहेर जाण्यास सोयीचे ठरतात. मात्र उत्तरे कडील प्रवेशव्दारासमोर फक्त ६ फूट जागा आहे. यामुळे अनुयायांना बाहेर पडण्यास प्रचंड त्रास होतो. चेंगराचेंगरी होण्याचीही शक्यता आहे. याचा विचार करता ३.८४ एकर जागेची मागणी दीक्षाभूमी स्मारक समिती गेल्या ४० ते ४५ वषार्पासून शासनाकडे करीत आहे. यासंदर्भात समितीने वेळोवेळी शासनाकडे पत्रव्यवहार केलेला आहे. २०१८ च्या दीक्षाभूमी नाविन्यपूर्ण विस्तारीकरण अहवालात शासनाने नियुक्त केलेली डिझाईन असोसिएट (नोएडा) यांनी सुध्दा ही जागा अत्यावश्यक असल्याचे नमूद केले आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनीही ही बाब शासनाच्या निदर्शनास आणली असल्याचे गजभिये यांनी सांगितले.
दीक्षाभूमीच्या उत्तरेकडील ३.८४ एकर जागेसाठी राज्याने केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 1:30 AM
आंबेडकरी जनतेचे श्रध्दास्थान असलेल्या नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीला स्तूपाच्या उत्तरेकडील प्रवेश व्दारासमोर असलेली भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची ३.८४ एकर जागा उपलब्ध करावी यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे शिफारशीसह प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी आमदार प्रकाश गजभिये यांनी गुरुवारी औचित्याच्या मुद्याव्दारे विधान परिषदेत केली.
ठळक मुद्देविधान परिषद : प्रकाश गजभिये यांची औचित्याच्या मुद्याव्दारे मागणी