लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वसामान्य नागरिकांची मते जाणून घेऊन जाहीरनामा तयार करण्यात येत आहे. वेगळ्या विदर्भाबाबत पक्ष नेतृत्वाशी चर्चा करून त्याचाही निर्णय करू, असे सकारात्मक आश्वासन काँग्रेसच्या जाहीरनामा विभागाचे समन्वयक खासदार प्रो. राजीव गौडा यांनी येथे दिले.लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निर्देशानुसार पक्षाने तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीसाठी आवश्यक जाहीरनामा तयार करण्यासाठी ‘जन आवाज’च्या माध्यमातून देशभरातील नागरिकांची मते जाणून घेण्यात येत आहेत. नागपुरातील प्रेस क्लब येथे सोमवारी आयोजित कार्यक्रमात याची सुरुवात करण्यात आली. यावेळी अमोल देशमुख, हर्षवर्धन निकोसे, डॉ. सुचिता देशमुख उपस्थित होते.यावेळी गौडा यांनी व्यापारी, पत्रकार, उद्योजकांसोबत सामान्य नागरिकाशी जाहीरनाम्याबाबत चर्चा केली. गौडा यांनी सांगितले की, सामान्य नागरिकांची मते जाणून घेतल्यावरच जाहीरनामा तयार करण्यात येणार आहे. यासाठी २० लोकांची एक टीम तयार करण्यात आली आहे. सामान्य नागरिकांच्या सूचनांच्या आधारे जाहीरनामा तयार करून तोच जनतेपुढे मांडण्यात येणार आहे. जीएसटी आणि नोटाबंदीने छोटे व्यापारी आणि अर्थव्यवस्थेचे मोठ नुकसान केल्याची टीका त्यांनी केली. व्यापारी, उद्योजकांनी विदर्भातील उद्योगासंदर्भात विशेष लक्ष घालून त्याच्या भरभराटीसाठी सवलती देण्याच्या सूचना केली. काहींनी स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा जाहीरनाम्यात समावेश करण्याची सूचना केली. यावर बोलताना गौडा म्हणाले, एक भाषेचे एक राज्य असावे, अशी भावना होती. आंध्रप्रदेशचे दोन राज्य झाले. वेगळ्या विदर्भाबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून यावर सकारात्मक विचार करण्यात येईल. भाजप हिंदुराष्ट्र, मनुवादी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्नात आहे. मुस्लीम, दलितांवर अत्याचार होत आहेत. दलित, मुस्लिमांच्या हितांचे रक्षण काँग्रेसतर्फे करण्यात येईल, असे ते म्हणाले. तत्पूर्वी ग्रामपंचायतींमध्ये विजयी झालेले काँग्रेसचे सरपंच आणि सदस्यांना गौरव करण्यात आला.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात विदर्भ राज्याचा विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 10:20 PM
सर्वसामान्य नागरिकांची मते जाणून घेऊन जाहीरनामा तयार करण्यात येत आहे. वेगळ्या विदर्भाबाबत पक्ष नेतृत्वाशी चर्चा करून त्याचाही निर्णय करू, असे सकारात्मक आश्वासन काँग्रेसच्या जाहीरनामा विभागाचे समन्वयक खासदार प्रो. राजीव गौडा यांनी येथे दिले.
ठळक मुद्देनागरिकांच्या सूचना : खासदार राजीव गौडा यांचे सकारात्मक आश्वासन