नागपूर : चिंधी बाजाराचा व्यवसाय करणाऱ्या मातंग समाजाला कायमस्वरूपी दुकाने बांधून देण्याच्या मागणीसाठी चिंधी बाजाराच्या शिष्टमंडळाने महापौरांना निवेदन दिले आहे. संत्रा मार्केटमध्ये बसणारे खवावाले, पानवाने, संत्रावाल्यांना कायमस्वरूपी दुकाने देण्यात आली आहेत. मात्र, शंभर वर्षांपासून चिंधी बाजार करणाऱ्या मातंग समाजाला दुकाने मिळालेली नाहीत. त्यामुळे समाजाला लवकरात लवकर स्थायी दुकाने मिळवून द्यावीत, या मागणीसाठी लहू सेनेचे प्रमुख संजय कठाळे यांच्या नेतृत्वात महापौर दयाशंकर तिवारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महापौरांनी कायमस्वरूपी दुकाने देण्याचे आश्वासन दिले. यावेळी पवन मोरे, सुरेश कावळे, अशोक खडसे, रूपेश सनेश्वर, जावेद पठाण, रवींद्रन खडसे, जितेंद्र गायकवाड, जीवन गायकवाड, विक्की ओगले, आरती गंगावणे, पार्वती खडसे, अजाबराव खडसे, जय नवरखेले, सुशील शेलारे, रूपेश तायवाडे, प्रेम तायवाडे, संजय इंगळे, मंगेश तायवाडे उपस्थित होते.
..............