शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
2
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
3
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
4
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
5
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
6
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
7
सणासुदीत प्रशासनाचे हात केळी खायला जातात?
8
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
9
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
10
निवडणूक आचारसंहिता कधी लागू होणार? वेगवेगळ्या दाव्यांमुळे उत्सुकता वाढली; आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक
11
‘सीएम’पदासाठी कोण? हे आधी महायुतीने सांगावे! मविआच्या नेत्यांचे सूर जुळले; आधीच्या चर्चांना पूर्णविराम
12
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार
13
धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही 
14
लाडक्या बहिणींची गर्दी पाहून ‘त्यांच्या’ छातीत धडकी : मुख्यमंत्री
15
"उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत", राज ठाकरे यांचा निषाणा; ‘पुष्पा’ असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांवरही टीका
16
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
17
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
18
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
19
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
20
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?

दयाशंकरसिंग यांचा पुतळा जाळला

By admin | Published: July 22, 2016 2:50 AM

अध्यक्ष मायावती यांच्या विरुद्ध भाजपाचे उत्तर प्रदेश उपाध्यक्ष दयाशंकरसिंग यांनी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले आहे.

बसपा कार्यकर्ते आक्रमक : मायावतींच्या विरोधातील वक्तव्याचा निषेध नागपूर : अध्यक्ष मायावती यांच्या विरुद्ध भाजपाचे उत्तर प्रदेश उपाध्यक्ष दयाशंकरसिंग यांनी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले आहे. नागपुरातही बसपाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल करीत निदर्शने केली. दयाशंकरसिंग यांच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन करून आपला रोष व्यक्त केला. यनंतर राष्ट्रपती व प्रधानमंत्री यांना निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन सादर केले. भाजपचे उत्तर प्रदेशचे दयाशंकरसिंग यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत बोलतांना बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा व राज्यसभेच्या खासदार मायावती यांच्याबद्दल बोलताना अभद्र भाषेचा वापर केला. त्यामुळे बसपा कार्यकर्त्यांंमध्ये प्रचंड संताप आहे. गुरुवारी दुपारी बसपाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने धडक देऊन निषेध व्यक्त केला. यावेळी केंद्र सरकार, भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधातही नारेबाजी करण्यात आली. दरम्यान दयाशंकरसिंग यांच्या पुतळ्याचे दहनसुद्धा करण्यात आले. मायावतींच्या विरुद्ध ज्या भाषेत बोलले गेले तो केवळ एका व्यक्तीचा अपमान नसून संपूर्ण महिलांचा अपमान आहे. त्यामुळे आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो. दयाशंकरसिंग यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून लवकरात लवकर तुरुंगात डांबण्यात यावे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नैतिकतेच्या आधारे सिंग यांना भाजपमधून ताबडतोब निलंबित करावे, अशी मागणी यावेळी करण्यात अली. असे न झाल्यास बहुजन समाज पार्टी संपूर्ण राज्यात रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करत राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. याशिवाय देशभरात दलितांवर सुरू असलेल्या अत्याचाराचा आणि मुंबईतील आंबेडकर भवन पाडल्याचा निषेध सुद्धा यावेळी करण्यात आला. आंदोलनात राज्याचे प्रभारी प्रेम रोडेकर,महासचिव जितेंद्र मैसकर, प्रदेश सचिव सागर डबरासे,उत्तम शेवडे, नाना देवगडे, राजू बसवनाथे, जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर, राजकुमार बोरकर, मोहन राईकवार, त्र्यंबक घरडे, पृथ्वीराज शेंडे, विवेक हाडके, रुपेश बागेश्वर, मिलिंद बसोड, गौतम पाटील, संजय जैस्वाल, महेश साहारे, चंद्रशेखर कांबळे, कविता लांडगे, आनंद सोमकुवर, अभिषेक शंभरकर, मुरली मेश्राम यांच्यासह विदर्भातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)