शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
2
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
3
अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
4
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
5
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
6
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
7
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
8
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
9
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
10
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
11
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
12
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
13
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
14
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
15
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
16
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
17
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
18
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
19
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
20
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"

जयताळातील केंद्राची स्थिती : स्टाफकडूनच स्वॅब तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 9:59 PM

जयताळा येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर रुग्णसंख्येचा भार अधिक आहे. असे असले तरी येथे एकमेव असलेल्या लॅब टेक्निशियन महिला कर्मचाऱ्यावर सोमलवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचाही भार आहे. परिणामत: केवळ एक दिवसाच्या प्रशिक्षणावर येथील स्टॉफमधील परिचारिकाच स्वॅब तपासणी करतात, नमुने घेतात आणि १५ मिनिटात रिपोर्टही देतात, अशी स्थिती शनिवारी दुपारी दिलेल्या भेटीदरम्यान पहावयास मिळाली.

ठळक मुद्दे लॅब टेक्निशियनवर अतिरिक्त भार : १५ मिनिटात मिळतो रिपोर्ट

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जयताळा येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर रुग्णसंख्येचा भार अधिक आहे. असे असले तरी येथे एकमेव असलेल्या लॅब टेक्निशियन महिला कर्मचाऱ्यावर सोमलवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचाही भार आहे. परिणामत: केवळ एक दिवसाच्या प्रशिक्षणावर येथील स्टॉफमधील परिचारिकाच स्वॅब तपासणी करतात, नमुने घेतात आणि १५ मिनिटात रिपोर्टही देतात, अशी स्थिती शनिवारी दुपारी दिलेल्या भेटीदरम्यान पहावयास मिळाली.या केंद्रावर रुग्णसंख्येचा भार अधिक आहे. सकाळपासूनच कोविड १९ची चाचणी करून घेणाऱ्यांची गर्दीही अधिक असते. शनिवारी दुपारी १.४५ वाजेपर्यंत या केंद्रावर ९४ जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. तरीही जवळपास ९ ते १० नागरिक प्रतीक्षेत होते. दुपारपर्यंत झालेल्या चाचण्यांमधून चार रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह निघाले. या सर्वांचे नमुने घेऊन त्यांची तपासणी केल्यावर प्रमाणपत्र देण्याचे काम येथील परिचारिका करताना दिसल्या. सकाळी ९.१५ वाजता नागरिकांना प्रवेश देऊन १०.३० वाजता तपासणीचे काम सुरू केले जाते. दुपारी २ वाजेपर्यंत हे काम चालते. दिवसभरात सरासरी १०० नमुने तपासले जातात. २७ आॅगस्टला ९२ नमुने तपासण्यात आले. त्यातील ११ नमुने पॉझिटिव्ह निघाले. २८ आॅगस्टला ५५ नमुने तपासण्यात आले. त्यात ५, तर २९ आॅगस्टला दुपारी १.४५ वाजेपर्यंत तपासलेल्या नमुन्यांमध्ये ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह निघाल्याची नोंद येथील रजिस्टरवर घेण्यात आली आहे.केंद्रावरील परिचारिकांना पुरेसे ग्लोव्ज पुरविण्यात आलेले नाहीत. एक परिचारिका फाटलेले ग्लोव्ज घालून काम करताना दिसली. तोंडावरील शिफ्ड मात्र नवे होते. ते आजच मिळाल्याचे चर्चेतून समजले.१५ मिनिटात मिळणाऱ्या रिपोर्टवर शंकाया केंद्रावर तपासणी झाल्यावर अवघ्या १५ मिनिटात रिपोर्ट मिळतो. त्यामुळे एवढ्या तडकाफडकी मिळणाऱ्या या रिपोर्टवर रुग्णांनी शंका व्यक्त केली. एक रुग्ण म्हणाला, माझ्या भावाला कसलाही त्रास नसताना त्याचा नमुना पॉझिटिव्ह आला. फक्त १५ मिनिटात रिपोर्ट मिळाल्याने त्यावर विश्वास कसा ठेवायचा, असा त्याचा प्रश्न होता.पॉझिटिव्ह रुग्णालाही गृह विलगीकरणाचा सल्लाया केंद्रावर शनिवारी पॉझिटिव्ह निघालेल्या एका रुग्णाला उपचारासाठी दाखल करून न घेता गृह विलगीकरणात ठेवण्याचा सल्ला देण्यात आला. दवाखान्याचे वाहन घरीच येऊन औषधोपचार करेल, असे सांगण्यात आल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली.बाबूळखेडा आरोग्य केंद्रात दररोज शंभरावर तपासणी

महापालिकेचे बाबूळखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज १०० च्या जवळपास कोविड-१९ ची तपासणी केली जाते. येथील महिला कर्मचारी यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ९ ते १०.३० पर्यंत येणाऱ्या व्यक्तींची चाचणीसाठी नोंदणी केली जाते. नंतर आदल्या दिवशी केलेल्या तपासणीचे रिपोर्ट दिले जातात. त्यानंतर स्वॅब तपासणीला सुरुवात केली जाते. ५० लोकांच्या तपासणीचे लक्ष्य आहे, मात्र जवळपास १०० व्यक्तीची तपासणी केली जात असल्याचे आणि टोकननुसार ४ वाजेपर्यंत ती चालत असल्याचे या कर्मचाऱ्याने सांगितले. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत तपासणीचा वेळ दिला आहे, त्यामुळे या वेळात अनेक लोकांची तपासणीसाठी गर्दी होते पण एवढ्या लोकांची तपासणी शक्य होत नसल्याने अनेकांना निराश होऊन परतावे लागते. ठराविक वेळ आणि मर्यादित संख्येबाबत माहिती मिळण्याची व्यवस्था नसल्याने नागरिकांना मनस्तापही सहन करावा लागतो. तशी व्यवस्था करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर