शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

नागपूर, अकोला, वाशीम जिल्हा परिषद निवडणुकीत यथास्थिती ठेवण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 8:21 PM

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यातील कलम १२(२)(सी) मधील तरतुदीनुसार ठरवलेले आरक्षण ५० टक्क्यांवर जाते. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य सरकारला या तरतुदीमध्ये आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देऊन तेव्हापर्यंत नागपूर, अकोला व वाशीम जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेत यथास्थिती ठेवण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देहायकोर्ट : कायदा दुरुस्तीसाठी दिली तीन महिन्यांची मुदत

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यातील कलम १२(२)(सी) मधील तरतुदीनुसार ठरवलेले आरक्षण ५० टक्क्यांवर जाते. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य सरकारला या तरतुदीमध्ये आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देऊन तेव्हापर्यंत नागपूर, अकोला व वाशीम जिल्हा परिषदेच्यानिवडणूक प्रक्रियेत यथास्थिती ठेवण्याचा आदेश दिला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. २०१० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कुठेही ५० टक्क्यांवर आरक्षण निश्चित करता येत नाही. असे असताना राज्यात महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यातील कलम १२(२)(सी) मधील तरतुदीची अंमलबजावणी केली जात आहे. या तरतुदीनुसार ठरवलेले आरक्षण ५० टक्क्यांवर जाते. त्यामुळे ही तरतूद राज्यघटनेतील अनुच्छेद १४, २४३-डी व २४३-टी मधील तरतुदींशी विसंगत आहे. २०१६ मध्ये उच्च न्यायालयात दाखल एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान, राज्य सरकारने कलम १२(२)(सी) मधील वादग्रस्त तरतुदीत दुरुस्ती करण्यासाठी मंत्रिमंडळाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे व तो प्रस्ताव निर्णयाधीन असल्याचे सांगितले होते. परंतु, त्यानंतर प्रस्तावावर काहीच निर्णय घेण्यात आला नाही. आजही कायद्यातील मूळ तरतुदीनुसारच आरक्षण निश्चित केले जात आहे. परिणामी, उच्च न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला. यासंदर्भात यशवंत आष्टणकर व विकास गवळी यांनी याचिका दाखल केल्या होत्या. हा आदेश देऊन त्यांच्या याचिका निकाली काढण्यात आल्या. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. मुकेश समर्थ व अ‍ॅड. अक्षय नाईक, राज्य निवडणूक आयोगातर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट तर, सरकारतर्फे अ‍ॅड. निवेदिता मेहता यांनी कामकाज पाहिले.निवडणूक आयोगाची सरकारविरुद्ध याचिकामहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून राज्य सरकार वारंवार नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत अडथळे निर्माण करणारे निर्णय घेत असल्याचा आरोप केला आहे. सुरू झालेली निवडणूक प्रक्रिया राज्य सरकारमुळे रद्द करावी लागते व त्यानंतर नवीन प्रक्रिया राबवावी लागते. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तिला बाधा पोहोचेल असे निर्णय सरकारने घेऊ नये असे आयोगाचे म्हणणे आहे. न्यायालयाने या प्रकरणात राज्य सरकारला नोटीस बजावून ९ सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिलेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूक