लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तंबाखूच्या व्यसनामुळे कर्करोग जडला. रोगाचे निदान व त्यावरील उपचारामुळे अख्खे कुटुंबच रस्त्यावर आले. आर्थिक स्थिती हलाखीची झाली. मुलांचे करिअरही अडचणीत आले. तंबाखूच्या व्यसनाने नेस्तनाबूत झालो. म्हणूनच स्वत:च्या कुटुंबाचे, समाजाचे हित पहायचे असेल तर तंबाखू, गुटख्याच्या व्यसनापासून स्वत:ला दूर ठेवणे आवश्यक आहे, हे मनोगत विचार रेस्टॉरंटचे मालक व कर्करोग रुग्ण किशोर चितूरकर यांनी येथे व्यक्त केले.‘विदर्भ सोसायटी फॉर हेड अॅण्ड नेक कॅन्सर’ (व्हीएसएचएनओ), नीती क्लिनिक आणि रोटरी क्लब आॅफ नागपूर दक्षिण यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्यानिमित्ताने आयोजित ‘ओरल कॅन्सर सर्व्हायव्हर्स मीट’मध्ये बोलत होते. हडस हायस्कूलमध्ये आयोजित या कार्यक्रमात कर्करोगावर मात केलेल्या लोकांनी तंबाखू आणि कर्करोगाच्या परिणाम व वर्तमान जीवनावर प्रकाश टाकला.कार्यक्रमात ‘व्हीएसएचएनओ’चे अध्यक्ष डॉ. मदन कापरे, सचिव आर. रवी, रोटरी क्लबचे अध्यक्ष अमित गोखले, सचिव अमित कुकडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या संयोजकांची भूमिका डॉ. नीती कापरे, गुप्ता यांनी पार पाडली.चिमूरकर म्हणाले, तंबाखू किती घातक आहे, याची प्रचिती कर्करोग झाल्यावरच आली. स्वत:सोबतच संपूर्ण कुटुंबाला समस्यात ढकलले. मुलाची डॉक्टर होण्याची इच्छा होती, परंतु क्षमता असूनही आर्थिक स्थिती हलाखीची झाल्याने त्याला इंजिनीअर क्षेत्राकडे वळावे लागले. डॉक्टर आणि कुटुंबाच्या सदस्यांमुळे आता सामान्य जीवन जगत आहे.-युवराज सिंहकडून प्रेरणा मिळालीशिक्षक व समाजसेवक बीना सुरकर म्हणाल्या, कर्करोगाचे निदान झाल्यावर घाबरून गेले. परंतु सासरे आणि मुलाच्या सकारात्मक विचारांमुळे एक आत्मविश्वास निर्माण झाला. प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू युवराज सिंह यांच्याकडू प्रेरणा मिळाली. विशेष म्हणजे, पूर्णत: बरे झाल्यानंतर शाळेत प्रसाद वाटला तेव्हा शिक्षित लोक प्रसाद घ्यायलाही तयार नव्हते. हे विचित्र आहे. कॅन्सरला ‘कॅन सर्व्हायव्ह’च्या नजरेने पाहिले आणि आज पूर्वीपेक्षा खूप आनंदात आहे.कार्यक्रमाच्या दरम्यान विनायक देशमुख, विठ्ठलराव कुरवाडे, केशव मानकर आदींनीही आलेले अनुभव सांगितले. सर्वांचे एकच म्हणणे होते, कर्करोगाला घाबरू नका, त्याच्याशी लढा.या प्रसंगी अमेरिकन आॅन्कोलॉजीचे डॉ. नीती बोमनवार, डॉ. अजय गुप्ता, डॉ. आर.पी. देशमुख, डॉ. सुधांशु कोठे, डॉ. विदुला कापरे, डॉ. शानू जैन, डॉ. जय कुलकर्णी आदी उपस्थित होते. कर्करोगाशी यशस्वी लढा देणाऱ्यांसोबतच त्यांच्या कुटुंबाचाही सत्कार करण्यात आला.कर्करोगाला घाबरु नका, त्याला हरवाबँकेची नोकरी करणारे सुरेश तडसे यांना मुखासोबतच थायरॉईडचा कर्करोग असल्याचे निदान झाले. तडसे यांनी सांगितले, कर्करोगामुळे नैराश्याच्या गर्तेत सापडलो होतो. परंतु पत्नी आणि मित्राने हिंमत दिल्याने दोन वेळा शस्त्रक्रियेला सामोरे गेलो. आज वय ६२ आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह व अन्य समस्या असतानाही चांगले जीवन जगत आहे. कर्करोगाला घाबरू नका त्याला हरवा, असा संदेश त्यांनी आपल्या मनोगतातून दिला.
कुटुंबाच्या भल्यासाठी तंबाखूपासून दूर रहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 12:45 AM
तंबाखूच्या व्यसनामुळे कर्करोग जडला. रोगाचे निदान व त्यावरील उपचारामुळे अख्खे कुटुंबच रस्त्यावर आले. आर्थिक स्थिती हलाखीची झाली. मुलांचे करिअरही अडचणीत आले. तंबाखूच्या व्यसनाने नेस्तनाबूत झालो. म्हणूनच स्वत:च्या कुटुंबाचे, समाजाचे हित पहायचे असेल तर तंबाखू, गुटख्याच्या व्यसनापासून स्वत:ला दूर ठेवणे आवश्यक आहे, हे मनोगत विचार रेस्टॉरंटचे मालक व कर्करोग रुग्ण किशोर चितूरकर यांनी येथे व्यक्त केले.
ठळक मुद्देकर्करोगाच्या रुग्णांचे अनुभव : ‘ओरल कॅन्सर सर्व्हायव्हर्स मीट’