लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीवर अंतरिम स्थगिती दिली. निर्धारित निवडणूक प्रक्रियेचे काटेकोर पालन झाले नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्यामुळे ही स्थगिती देण्यात आली. तसेच, विद्यापीठाचे कुलसचिव व कुलगुरू यांना नोटीस बजावून १३ आॅगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले.यासंदर्भात डॉ. भीमराव वाघमारे व इतर सिनेट सदस्यांनी उच्च न्यायालयात दोन रिट याचिका दाखल केल्या आहेत. निर्धारित निवडणूक प्रक्रियेनुसार मतदानाच्या तारखेपासून ४५ दिवस आधी प्राथमिक मतदार यादी जाहीर करणे आवश्यक आहे. प्राथमिक मतदार यादीवर कुलसचिवांकडे आक्षेप नोंदविण्यासाठी पाच दिवसांची मुदत द्यायला पाहिले. तसेच, कुलसचिवांच्या आदेशाविरुद्ध कुलगुरूंकडे अपील करण्याची संधी मिळायला हवी. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदानाच्या तारखेपासून ३० दिवसांपूर्वी अंतिम मतदार यादी जाहीर करणे अनिवार्य आहे. परंतु, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीसाठी २१ जुलै २०१८ रोजी मतदार यादी जाहीर करण्यात आली व ११ आॅगस्ट २०१८ रोजी मतदान ठेवण्यात आले. परिणामी, संपूर्ण निवडणूक कार्यक्रम अवैध असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. फिरदोस मिर्झा, अॅड. अनिल किलोर व अॅड. अश्फाक शेख यांनी कामकाज पाहिले.
अमरावती विद्यापीठ व्यवस्थापन परिषद निवडणुकीवर स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 10:50 PM
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीवर अंतरिम स्थगिती दिली. निर्धारित निवडणूक प्रक्रियेचे काटेकोर पालन झाले नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्यामुळे ही स्थगिती देण्यात आली. तसेच, विद्यापीठाचे कुलसचिव व कुलगुरू यांना नोटीस बजावून १३ आॅगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले.
ठळक मुद्देहायकोर्टाचा आदेश