शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
4
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
5
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
6
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
7
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
8
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
9
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
10
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
11
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
12
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
13
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
14
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
15
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
16
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
17
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
18
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
19
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
20
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

मुख्यालयी राहा अन्यथा कारवाई करू!

By admin | Published: August 07, 2016 2:12 AM

मुख्यालयी राहत असल्याचे दाखवून घरभाडे भत्ता उचलला जातो. प्रत्यक्षात मुख्यालयी कुणीच राहात नाही

पालकमंत्र्यांचा इशारा : भिवापूर तालुक्यातील नांद गावात रात्रभर मुक्काम गणेश खवसे नांद मुख्यालयी राहत असल्याचे दाखवून घरभाडे भत्ता उचलला जातो. प्रत्यक्षात मुख्यालयी कुणीच राहात नाही. यापुढे असे निदर्शनास आल्यास अधिकारी - कर्मचाऱ्यांवर कारवाई करू, असा सज्जड इशारा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. पालकमंत्री बावनकुळे यांनी शनिवारी नांद या गावाला भेट देत रात्रभर मुक्काम ठोकला. दरम्यान, या भेटीत त्यांना तेथे असणाऱ्या समस्या ग्रामस्थांनी अवगत करून दिल्या. प्राथमिक आरोग्य केंद्र, तलाठी कार्यालय, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय येथे बावनकुळे यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्यांना अनेक त्रुटी दिसून आल्या. यानंतर त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना ‘कर्मचाऱ्यांवर कारवाई करू’ असे स्पष्ट केले. प्रशासनात गती निर्माण करणे, कामांना होणारा विलंब टाळणे, काम व्यवस्थित चाललेले आहे की नाही, नागरिकांच्या प्रमुख समस्या कोणत्या हे जाणून घेणे तसेच २४ जून २०१४ च्या शासन परिपत्रकानुसार अधिकारी - कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागात एक दिवस मुक्काम करावा यादृष्टीने जनजागृती होण्याच्या उद्देशाने पालकमंत्री बावनकुळे यांनी नागपूर जिल्ह्यातील एका गावात रात्रीचा मुक्काम करण्याचे ठरविले होते. यानुसार कोणत्या गावात मुक्काम करणार याचा उदोउदो न करता, प्रशासनाच्या त्रुटी लक्षात येण्यासाठी त्यांनी गावाचे नाव अखेरपर्यंत उघड केले नाही. याअंतर्गत त्यांनी भिवापूर तालुक्यातील नांद हे गाव निवडले. तेथे दुपारच्या सुमारास ते दाखल झाले. त्यांच्यासोबत आ. सुधीर पारवे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी कादंबरी बलकवडे आदी दौऱ्यात सहभागी झाले होते. सर्वप्रथम पालकमंत्र्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची आकस्मिक पाहणी केली. तेथे वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर कुणीही हजर नव्हते. तेथील दुरवस्था बघून पालकमंत्र्यांनी गैरहजर असणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात सूचना केल्या. आरोग्य केंद्रात औषधाचा तुटवडा असल्याचे काहींनी सांगताच याबाबत पालकमंत्र्यांनी तेथील उपस्थितांना याबाबत विचारपूस केली. दरम्यान, औषधाचा साठा डॉक्टरच्या क्वॉर्टरमध्ये आढळून आला. त्यामुळे पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करीत तसा शेरा रजिस्टरमध्ये नोंदविला. यानंतर बावनकुळे यांनी जिल्हा परिषद हायस्कूल, पोलीच चौकी येथील पाहणी केली. स्वस्त धान्य दुकानात जाऊन तेथील साठा आणि वितरण याची नोंद असणारी नोंदवही तपासली. त्यात त्यांना तफावत आढळून आली. दुसऱ्या एका रेशन दुकानातही तोच प्रकार निदर्शनास आला. रॉकेलचे प्रत्यक्ष कुणाला वितरण केले जाते, याची चौकशी करतो असे म्हणताच रॉकेल दुकानदाराची भंबेरी उडाली. त्याने चूक झाल्याचे मान्य केले. मात्र यापुढे असा प्रकार झाल्यास परवाना निलंबित करण्याचा दम पालकमंत्र्यांनी भरला. यासोबतच देशी दारू दुकानातील स्टॉक तपासला. या चौकशीत देशी दारू दुकानदाराकडे परवाना नसल्याचे उघड झाले. परवाना नूतनीकरणास पाठविला असून पोचपावती आहे असे सांगत परवाना नागपूर येथील घरी असल्याचे त्याने पालकमंत्र्यांना सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी परवाना हा दुकानाच्या दर्शनी भागावर लावण्यास त्याला सांगितले. मात्र दुकानदाराने ‘परवाना उंदीर कुरतडतात, त्यामुळे तो दर्शनी भागात लावला नाही’ असे सांगताच उपस्थितांमध्ये हंशा पिकला. तलाठी कार्यालयात दिलेल्या भेटीदरम्यान अनेक नोंदवहीमध्ये नोंदीच नसल्याचे आढळले. त्यामुळे पुन्हा पालकमंत्री संतापले. वारसान फेरफार प्रलंबित आहे. वसुली झालेली असली तरी नोंदी नाहीत. अशा अनेक बाबी उघडकीस आल्या. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तलाठ्याला धारेवर धरत सात दिवसांच्या आत रेकॉर्ड दुरुस्त करण्याचे निर्देश दिले. ग्रामपंचायत कार्यालयात भेट देऊन तेथील नोंदवह्यातपासल्या. तेथेही अनेक त्रुटी आढळून आल्या. (प्रतिनिधी) गावात ९० टक्के असुविधा शासनाच्या २४ जून २०१४ च्या परिपत्रकाची अंमलबजावणी होण्याच्या उद्देशाने हा मुक्काम दौरा होता. यानिमित्ताने येथे कोणकोणत्या समस्या आहेत, हे जाणून घेतले. स्वस्त धान्य दुकानात १८०० लिटर रॉकेल येते, पण रॉकेल मिळत नाही, रेशन मिळत नाही. शाळेतील शिक्षक, आरोग्य अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी येथे मुख्यालय असल्याचे दर्शवित मुक्कामी राहत असल्याचे प्रमाणपत्र सादर करून घरभाडे भत्ता उचलतात. प्रत्यक्षात गावात राहात नाही, शिक्षक दुपारी १२ वाजता शाळेत येतात. यामुळे प्रशासकीय सेवेवर जनतेचा आक्रोश, नागरिकांनी तो माझ्यासमोर मांडला. एक ना अनेक समस्या येथे आहेत. त्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. नांदला मिळणार ५० लाखांचा निधी महिन्यातून एकदा आपण जिल्ह्यातील एका गावात मुक्काम करणार आहे. तेथील समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतीलच. शिवाय यासाठी विशेष बाब म्हणून पालकमंत्र्याच्या कोट्यातून शासनाकडून ५० लाख रुपयांचा निधी संबंधित गावाला देण्यात येईल. नांद या गावालासुद्धा ५० लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी नांदच्या भेटीदरम्यान ग्रामस्थांना आश्वासन दिले.