शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

राज्यस्तरीय नर्सिंग परीक्षेवर स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:29 AM

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी काही विद्यार्थिनींच्या याचिकेची गंभीर दखल घेऊन राज्यस्तरीय आॅक्सिलियरी नर्सिंग मिडवायफरी (एएनएम) व जनरल नर्सिंग अ‍ॅन्ड मिडवायफरी (जीएनएम) परीक्षेवर अंतरिम स्थगिती दिली.

ठळक मुद्देहायकोर्टाचा आदेश : वैद्यकीय शिक्षण सचिवांना नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी काही विद्यार्थिनींच्या याचिकेची गंभीर दखल घेऊन राज्यस्तरीय आॅक्सिलियरी नर्सिंग मिडवायफरी (एएनएम) व जनरल नर्सिंग अ‍ॅन्ड मिडवायफरी (जीएनएम) परीक्षेवर अंतरिम स्थगिती दिली.ही परीक्षा स्टेट बोर्ड आॅफ नर्सिंग अ‍ॅन्ड पॅरामेडिकल एज्युकेशनद्वारे २४ जुलै रोजी घेण्यात येणार होती. बोर्डला ही परीक्षा घेण्याचा कायदेशीर अधिकार नसल्याचा दावा काही विद्यार्थिनींनी केला आहे. त्यात प्रथमदर्शनी तथ्य आढळून आल्यामुळे न्यायालयाने परीक्षेवर अंतरिम स्थगिती दिली. तसेच, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिवांना नोटीस बजावून बोर्डाला ही परीक्षा घेण्याचा अधिकार कोणी दिला अशी विचारणा केली व याचिकाकर्त्यांच्या तक्रारीवर तीन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला.इंडियन नर्सिंग कौन्सिलने बोर्डाला ही परीक्षा घेण्याची मान्यता दिली नाही असे सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगण्यात आले. यासंदर्भात ‘एएनएम’च्या तीन व ‘जीएनएम’च्या तीन अशा एकूण सहा विद्यार्थिनींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. आनंद परचुरे यांनी बाजू मांडली.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयexamपरीक्षा