शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
3
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
4
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
5
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
6
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
7
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
8
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
9
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
10
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
11
BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

वासनकर गुंतवणूकदार फसवणूक खटल्याला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 11:23 PM

गुंतवणूक क्षेत्राच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणाऱ्या वासनकर कंपनी गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणातील खटल्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी अंतरिम स्थगिती दिली. हा खटला एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात प्रलंबित आहे.

ठळक मुद्देहायकोर्ट : दोषारोप निश्चित करण्याच्या आदेशाला आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुंतवणूक क्षेत्राच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणाऱ्या वासनकर कंपनी गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणातील खटल्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी अंतरिम स्थगिती दिली. हा खटला एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात प्रलंबित आहे.१२ एप्रिल २०१८ रोजी विशेष सत्र न्यायालयाने प्रकरणातील आरोपींविरुद्ध भादंवि, महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय आस्थापनामधील) हितसंबंधाचे रक्षण करण्याबाबत अधिनियम (एमपीआयडी) व अन्य संबंधित कायद्यांतील विविध कलमांतर्गत दोषारोप निश्चित केले. त्यावर आरोपींचा आक्षेप आहे. विशेष सत्र न्यायालयाने दोषारोप निश्चित करताना सुनावणीची संधी दिली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशांत वासनकर, भाग्यश्री वासनकर व इतर काही आरोपींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दोषारोप निश्चित करण्याचा वादग्रस्त आदेश रद्द करण्यात यावा, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. याचिकेवर न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता खटल्याला अंतरिम स्थगिती दिली व राज्य सरकारला नोटीस बजावून १४ आॅगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.प्रकरणामध्ये वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीचा सर्वेसर्वा प्रशांत जयदेव वासनकर, प्रशांतची आई सरला, पत्नी भाग्यश्री, भाऊ विनय, साळा अभिजित चौधरी, सासू कुमुद चौधरी, विनयची पत्नी मिथिला, सीए पराग हांगेकर, कर्मचारी सुजित मजुमदार, मीनाक्षी कोवे, श्रीनिवासन अय्यर यांच्यासह एकूण २५ आरोपींचा समावेश आहे. तपास अधिकाऱ्यांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४०६, ४०९, १२० (ब),महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय आस्थापनामधील) हितसंबंधाचे रक्षण करण्याबाबत अधिनियम (एमपीआयडी)मधील कलम ३ यासह आरबीआय व सेबी कायद्यातील संबंधित कलमांतर्गत चार दोषारोपपत्रे दाखल केली होती. पहिले दोषारोपपत्र २४ सप्टेंबर २०१४ रोजी दाखल करण्यात आले. त्यानंतर १६ आॅक्टोबर २०१४, १६ जुलै २०१५ व १० आॅगस्ट २०१६ रोजी अतिरिक्त दोषारोपपत्रे दाखल करण्यात आली. याचिकाकतर्त्यांतर्फे अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण यांनी बाजू मांडली.अशी केली फसवणूकवासनकर कंपनीने आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून मासिक, तिमाही, वार्षिक, द्विवार्षिक, १८ महिने, ३३ महिने, ४८ महिने अशा विविध कालावधीसाठी वेगवेगळ्या योजनांतर्गत गुंतवणूकदारांकडून मोठमोठ्या रकमांच्या ठेवी स्वीकारल्या. त्यानंतर कंपनीने गुंतवणूकदारांना कराराप्रमाणे ठेवी परत केल्या नाहीत व परतावाही दिला नाही. अशा प्रकारे शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करण्यात आली.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयInvestmentगुंतवणूक