खापरखेडा : अज्ञात चाेरट्याने बीअर बारमधून राेख रक्कम व विदेशी दारू असा एकूण १८ हजार २५५ रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना खापरखेडा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदा शिवारात साेमवारी (दि.३०) पहाटेच्या सुमारास घडली.
विलास उमाशंकर उकाेने (३६, रा. वाॅर्ड क्र. १६, पहलेपार) यांचे नांदा शिवारातील पाईपलाईन राेडवर खापा बीअर बार ॲण्ड रेस्टॉरंट आहे. अज्ञात चाेरट्याने बारचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात चाेरट्याने बारमधून १६,७५५ रुपये किमतीची विदेशी दारू व राेख १,५०० रुपये असा एकूण १८ हजार २५५ रुपयाचा मुद्देमाल चाेरून नेला. ही बाब लक्षात येताच उकाेने यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी भादंवि कलम ४६१, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस हवालदार नावेद खान करीत आहेत.