काँग्रेसच्या सुकाणू समितीत राज्यातून शिंदे, वासनिक, पांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:59 AM2018-02-18T00:59:10+5:302018-02-18T01:03:54+5:30
अ.भा. काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाची कार्यसमिती बरखास्त केली आहे. पक्षाची नवी समिती स्थापन होईपर्यंत कामकाज चालविण्यासाठी देशभरातील ३४ नेत्यांचा समावेश असलेली सुकाणू समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये महाराष्ट्रातून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री मुकुल वासनिक व माजी खासदार अविनाश पांडे यांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अ.भा. काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाची कार्यसमिती बरखास्त केली आहे. पक्षाची नवी समिती स्थापन होईपर्यंत कामकाज चालविण्यासाठी देशभरातील ३४ नेत्यांचा समावेश असलेली सुकाणू समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये महाराष्ट्रातून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री मुकुल वासनिक व माजी खासदार अविनाश पांडे यांचा समावेश आहे.
नागपूरचे माजी मंत्री विलास मुत्तेमवार हे काँग्रेस कार्य समितीचे सदस्य होते. त्यामुळे कार्यसमिती बरखास्त करून स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीमध्ये मुत्तेमवार यांचा समावेश होईल, असे अपेक्षित होते. मात्र, मुत्तेमवार यांना या नेत्यांच्या यादीत स्थान मिळालेले नाही. या समितीमध्ये राहुल गांधी यांच्यासह माजी अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, ए.के. अॅन्टोनी, अहमद पटेल, अंबिका सोनी, बी.के. हरीप्रसाद, डॉ. सी.पी. जोशी, दिग्विजय सिंग, गुलाम नबी आझाद, हेमो प्रोवा सैकिया, जनार्दन द्विवेदी, कमल नाथ, मोहन प्रकाश, मोतीलाल व्होरा, सुशिला तिरीया, मल्लिकार्जुन खरगे, असोक गहलोत, के.सी. वेणुगोपाल, दीपक बाबरिया, पी.सी. चाको, आशा कुमारी, डॉ. ए. चेल्ला कुमार, आर.पी.एन. सिंग, पी.एल. पुनिया, आर.सी. कुंताई, डॉ. करणसिंग, जी. चिदंबरम, आॅस्कर फर्नांडिस, आनंद शर्मा, रणदीपसिंग सुरजेवाला यांचा समावेश आहे.