शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
5
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
6
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
8
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
9
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
10
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
11
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
12
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
13
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
14
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
15
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

चक्क शौचालयात गावठी दारुचा साठा, गुढीपाडव्याच्या तोंडावर २०० लीटर दारू जप्त

By योगेश पांडे | Published: March 22, 2023 2:14 PM

एका आरोपीला अटक

नागपूर : तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी ३० हजार रुपयांची २०० लीटर मोहफुलाची गावठी दारू जप्त केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आरोपीने चक्क घराच्या शौचालयात दारुचा साठा भरून ठेवला होता. पोलिसांनी यात एका आरोपीला अटक केली आहे. निलेश उर्फ बंटी टेंभुर्णे (४२, भानखेडा, तहसील) असे त्याचे नाव आहे.

तहसील पोलीस ठाण्यातील पथक पेट्रोलिंग करत असताना बंटी हा दारू विक्री करत असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली. पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याच्या घराची तपासणी केली असता काहीच आढळले नाही. मात्र सहज शौचालयाचे दार उघडले असता तेथे दारुचा साठा आढळून आला. त्याने दोन रबरी ट्युबमध्ये १०० लीटर दारू साठवून ठेवली होती. तर १० लीटरच्या १० डबक्यांमध्ये उरलेली १०० लीटर दारू होती. त्याने चरण गौर याचा हा माल असल्याची माहिती दिली.

पोलिसांनी बंटीला अटक केली व त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. गौरचा शोध सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिरुद्ध पुरी, विनायक गोल्हे, संदीप बागुल, प्रविण सुरकर, संजय साहु, संदीप गवळी, कुणाल कोरचे, ओंकार राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीnagpurनागपूर