लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रभाग २२ मधील जलकुंभासमोरील कडबी तणाव येथील महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून १०० झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी जेसीबीच्या साहाय्याने झोपडपट्टीचे अतिक्रमण हटविले. कारवाईनंतर पथक माघारी फिरताच झोपडपट्टीधारकांनी पथकावर तुफान दगडफेक केली. यात डोक्याला दगड लागल्याने प्रवर्तन विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील यांच्यासह तीन पोलीस कर्मचारी व जेसीबी चालक जखमी झाला. तसेच जेसीबीच्या काचाचे नुकसान झाले.कडबी तणास पडाव येथे महापालिकेच्या मालकीची आठ एकर जागा आहे. या जागेवर अतिक्रमण करून १०० झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. महापालिकेच्या लकडगंज झोनच्या प्रवर्तन विभागातर्फे झोपडपट्टीधारकांना अतिक्रमण हटविण्याची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानतंरही झोपडपट्टीधारकांनी अतिक्रमण न काढल्याने २ फे बु्रवारी २०१८ रोजी महापालिका आयुक्तांनी अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार झोपडपट्टीचे अतिक्रमण हटविण्यात आले.अतिक्रमण हटविल्यानंतर पथक माघारी जाताना संतप्त झोपडपट्टीधारकांनी पथकावर तुफान दगडफेक केली. यात अशोक पाटील यांच्या डोक्याला दगड लागल्याने जखमी झाले. त्यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार करण्यात आले. दगडफेकीत लकडगंज पोलीस स्टेशनचे पीएसआय गडेकर, हेड कॉन्स्टेबल नाना कोठे, माया पिल्लेवान, जेसीबी चालक अज्जू शोला आदी जखमी झाले. पथकातील अन्य कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली. दगडफेकीनंतर पथक लकडगंज पोलीस स्टेशनला पोहचले. दगडफेक करणाऱ्यां
नागपुरात अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 9:21 PM
प्रभाग २२ मधील जलकुंभासमोरील कडबी तणाव येथील महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून १०० झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी जेसीबीच्या साहाय्याने झोपडपट्टीचे अतिक्रमण हटविले. कारवाईनंतर पथक माघारी फिरताच झोपडपट्टीधारकांनी पथकावर तुफान दगडफेक केली.
ठळक मुद्देसहायक आयुक्तांसह कर्मचारी जखमीजेसीबीच्या काचा फोडल्यामनपाच्या जागेवरील झोपडपट्टीचे अतिक्रमण हटविले