लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : बँक ऑफ इंडियाच्या काेदामेंढी (ता. माैदा) शाखेत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने खातेदारांची गैरसाेय हाेत आहे. रक्कम उचल करणे व भरणे यासाठी तासन् तास ताटकळत राहावे लागते. शाखेतील ही गर्दी काेराेनाच्या पथ्यावर पडण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे ही गैरसाेय तातडीने दूर करावी, अशी मागणी माजी जि. प. सदस्य याेगेश देशमुख यांच्यासह खातेदारांनी आहे.
काेदामेंढी बँक ऑफ इंडिया शाखेत माेठ्या संख्येत शेतकरी खातेधारक आहेत. मात्र बँकेत मनुष्यबळाची कमतरता असल्याने लहानसहान कामांसाठी तासन् तास ताटकळत राहावे लागते. सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. शेतकरी आपली कामे साेडून बॅंकेच्या कामासाठी येतात. परंतु बँकेच्या विलंबामुळे ग्राहक व शेतकऱ्यांची गैरसाेय हाेते. बँकेत दाेन कॅश काऊंटर सुरू करण्यात यावे तसेच शाखेत पुरेसे कर्मचारी नियुक्त करावे, पीक कर्जाची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यात यावे, अशीही मागणी खातेदारांनी निवेदनाद्वारे केली आहे. खातेदारांची गैरसाेय दूर न झाल्यास आंदाेलनाचा इशारा याेगेश देशमुख यांनी दिला आहे.
120721\179-img-20210712-wa0017.jpg
इंडीया बँक मध्ये गर्दी ची फोटो