लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : परिसरात रविवारी (दि. १६) दुपारी आलेल्या वादळ व पावसामुळे जलालखेडा व रामगाव शिवारातील माेसंबीची झाडे पडल्याने शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची मंगळवारी (दि. १८) पाहणी केल्याची माहिती तलाठी रवी उपरे यांनी दिली.
जलालखेडा (ता. नरखेड) परिसरात रविवारी दुपारी जाेरदार वादळ आले व अवकाळी पावसाच्या मुसळधार सरीही बरसल्या. या वादळामुळे माेतीराम बाराबात्रे, रा. जलालखेडा यांच्या रामगाव (ता. नरखेड) शिवारातील माेसंबीच्या बागेचे माेठे नुकसान झाले. माेतीराम बारापात्रे यांच्या सहा एकर शेतात माेसंबीची एकूण ८०० झाडे आहेत. ही सर्व झाडे सात वर्षांची असून, त्यांना फलधारणाही झाली आहे. वादळामुळे त्यांच्या शेतातील ६० माेसंबीची झाडे पडली.
याच शिवारात जलालखेडा (पुनर्वसन) येथील ललीत रेंगे यांची चार एकर शेती असून, त्यांच्या शेतात माेसंबीची फलधारणा झालेली ६५० झाडे आहेत. वादळामुळे त्यांच्याही शेतातील २२ झाडे पडली. या दाेन्ही शेतकऱ्यांनी माहिती दिल्यानंतर तलाठी रवी उपरे यांनी त्यांच्या शेतातील नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. शासनाने या नुकसानीची याेग्य भरपाई द्यावी, अशी मागणीही या शेतकऱ्यांनी केली आहे.
...
फळे गळाली
या वादळामुळे माेतीराम बारापात्रे, ललीत रेंगे यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या शेतातील माेसंबीची फळे माेठ्या प्रमाणात गळाल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे. आपण या दाेन्ही शेतकऱ्यांच्या शेतातील माेसंबीच्या नुकसानीची पाहणी केली आहे. त्यांच्या शेतात माेसंबीची झाडे पडल्याचे व फळे गळाल्याचे आढळून आले. या पाहणीचा अहवाल तयार केला असून, ताे वरिष्ठांना पुढील कार्यवाहीसाठी सादर केला आहे, अशी माहिती तलाठी रवी उपरे यांनी दिली.