शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

७ ते ९ जानेवारीदरम्यान विदर्भात पुन्हा वादळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 11:00 AM

येत्या ७ ते ९ जानेवारीदरम्यान नागपूरसह विदर्भात पुन्हा वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येत्या ७ ते ९ जानेवारीदरम्यान नागपूरसह विदर्भात पुन्हा वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच नागपुरात मागील दोन दिवसात पारा पुन्हा घसरला असून थंडी कायम आहे. इंग्लंडमधील रेडींग विद्यापीठातील हवामान अभ्यासक अक्षय देवरस यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. ७ ते ९ दरम्यान नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्र्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील बऱ्याच भागात, तर अमरावती, यवतमाळ, नांदेड, अकोला, वाशीम आणि बुलडाणा जिल्ह्यातील काही भागात (प्रामुख्याने पूर्व तालुक्यांमध्ये) मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. यादरम्यान पूर्व विदर्भात काही प्रमाणात गारपिटीची शक्यतादेखील नाकारता येणार नाही. पावसाचे प्रमाण आणि शक्यता ८ तारखेला अधिक राहील; तर ९ तारखेला पावसाचे प्रमाण कमी होऊन पूर्व विदर्भातच पावसाची शक्यता राहील. दरम्यान, मराठवाडा आणि खान्देशसह मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान राहील. ७ ते ९ दरम्यान विदर्भात ढगाळ हवामान आणि पावसामुळे किमान तापमानात वाढ अपेक्षित आहे, ज्यामुळे थंडीची तीव्रता कमी होईल. मात्र ८ आणि ९ तारखेला पावसामुळे दिवसा हवेतील गारवा जाणवेल. हवामानाच्या या स्थितीमुळे ८ ते १० जानेवारीदरम्यान विदर्भात पावसानंतर धुके पडण्याची स्थिती उद्भवेल. शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.दरम्यान, रविवारी नागपुरातील रात्रीचे तापमान १२ अंश सेल्सिअससह सरासरी राहिले आहे. तर दिवसाचे तापमान २ अंशाने खाली घसरून २५.३ अंशावर आले आहे.हवामान विभागानेसुद्धा ८ व ९ तारखेला पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. रविवारी विदर्भात चंद्रपूर १०.१ अंशासह सर्वाधिक थंड राहिले. बुलडाणा, गोंदिया, अकोला येथील किमान तापमान १०.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. तर गडचिरोली व यवतमाळमध्ये तापमान १४ अंश सेल्सिअस होते.

टॅग्स :Rainपाऊस