लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहर व ग्रामीण भागातून येणारे मलयुक्त दूषित पाणी नाग नदीद्वारे गोसेखुर्द प्रकल्पामध्ये मिसळत आहे. आ. डॉ. परिणय फुके यांनी केलेल्या मागणीची दखल घेत हे दूषित पाणी शुद्ध करण्यासाठी नाग नदीवर एसटीपी (सिवरेज ट्रीटमेंट प्लांट) उभारण्यासाठी एनटीपीसीने संमती दर्शविली आहे.गोसेखुर्द प्रकल्पात मिसळणारे दूषित पाणी थांबवावे, अशी तक्रार भंडारा जिल्ह्यातील शेतकºयांनी आमदार डॉ. परिणय फुके यांच्याकडे केली होती. यासंदर्भात डॉ. फुके यांनी एनटीपीसीचे कार्यकारी संचालक नंदा यांची भेट घेतली. त्यांना गावकºयांच्या समस्येसंदर्भात निवेदन दिले. नाग नदीवर मलनिस्सारण केंद्र उभारल्यास एनटीपीसीला आर्थिकदृष्ट्या कसा फायदा होऊ शकतो हे त्यांनी समजावून सांगितले. यावर कार्यकारी संचालक यांनी तत्त्वत: सकारात्मक सहमती दर्शविली. तसेच यासंदर्भात भंडाºयाचे जिल्हाधिकारी यांना भेटून तसा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, अशी सूचनाही करणार असल्याचे फुके यांनी सांगितले. एनटीपीसीचे कार्यकारी संचालक नंदा यांना निवेदन सादर करताना अॅड. एम. राव, त्रिपाठी, मौदा नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाके आदी उपस्थित होते.
एनटीपीसी नाग नदीवर उभारणार ‘एसटीपी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 1:48 AM
नागपूर शहर व ग्रामीण भागातून येणारे मलयुक्त दूषित पाणी नाग नदीद्वारे गोसेखुर्द प्रकल्पामध्ये मिसळत आहे.
ठळक मुद्देगोसेखुर्द प्रकल्पाला लाभ : परिणय फुके यांनी दिले निवेदन