प्रवीण खापरे/लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या संसर्गाचा प्रकोप जसजसा वाढतो आहे तसतशी धडकी कर्तव्यावर असलेल्या पोलीसांना भरत आहे. तरीदेखील कर्तव्य म्हणून देशहितासाठी आपली जबाबदारी पार पाडण्यास ते सज्ज आहेत. अशात लॉकडाऊन तोडणाऱ्यांना आवरण्याची मोठीच कसरत पोलिसांना करावी लागत असल्याचे चित्र देशभरात दिसत आहे. या सर्व धामधुमीत पोलीस आणि लॉकडाऊन तोडणाऱ्यांमध्ये जो अजब संवाद होत आहे, तो अतिशय मजेदार आहे. कधी जोरदार हसावे तर कधी आपलेच डोके आपटावे... असा हा संवाद चर्चेचा विषय आहे आणि नंतर तोच संवाद सोशल माध्यमांवर व्हायरल करून नेटिझन्सना चुटकुल्यांचा आस्वादही घेता येत आहे.शनिवारी रोजाचा पहिला दिवस होता आणि संध्याकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे काही मुले लॉकडाऊन तोडत बाहेर पडली. हसनबाग चौकात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्या मुलांना विचारले ‘बेटा कहाँ जार रहे हो. घर में रहो’. त्यावर ती मुले उत्तरली ‘चच्चा इफ्तार है, आप भी चलो’. अखेर त्यांची समजूत घालून त्यांना परत पाठविण्यात आले.सर्वात जास्त सांगण्यात येणारे कारण म्हणजे ‘किराणा आणायचा नं जी’. वाठोड्यात राहणारे नागरिक सक्करदºयावर किराणा आणण्यास जात असल्याचे कारण या मार्गातील पोलिसांना गेल्या महिनाभरापासून ऐकायला मिळत आहे. सक्करदºयावर तैनात असलेल्या पोलिसांनी अशाच एका नागरिकाला दोन्ही हात जोडून वंदन केले आणि आता तुझी आरतीच करतो, असा संताप व्यक्त केला. या व्यक्तीने सोबत हॉस्पिटलचे कार्ड ठेवले होते. कुठे चाललास असे विचारले असता, हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी चाललो आहे असे उत्तर मिळाले. कार्ड तपासले असता, त्याचे बिंग फुटले आणि त्याने पोलिसांपुढे शरणागतीच पत्करली. हॉस्पिटलचे ते कार्ड तब्बल दोन वर्षांपूर्वीचे होते आणि उपचारवगैरे आटोपले होते. अशा प्रकारची वेगवेगळी कारणे सांगत काही नागरिक लॉकडाऊनमध्ये बाहेर पडण्याचा प्रताप करत आहेत. सगळ्यात मजेशीर म्हणजे काही जण ‘कोरोना टेस्ट करायला जात आहे’ अशी कारणेही सांगत आहेत आणि सतत खोकलण्याचे नाटकही करताना आढळतात. पोलीस चेहºयावरचे हावभाव बघून, तंबी देऊन परतही पाठवत आहेत, हे विशेष.लॉकडाऊन तोडताना सांगितली जाणारी प्रमुख कारणेगरिबांना किट वाटायला जात आहे.गरजूंना जेवणाचे डबे वाटायला जात आहे.किराणा, भाजी आणायला जात आहे.मयतीला जात आहे.दुधाचे पाकीट आणायला जात आहे.नगरसेवकाकडून जेवणाचा डबा आणायला जात आहे.