शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

लोकशाही मजबूत करीत देशाची महासत्तेकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 7:50 PM

विकास प्रक्रियेत जनतेचा सक्रिय सहभाग, कर्तव्यभावनेची जोपासना तसेच राज्यघटनेतील नमूद मूल्यांच्या आधारे लोकशाही मजबूत करीत देश महासत्तेकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

ठळक मुद्देपालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे : ६९ वा प्रजासत्ताक दिन सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विकास प्रक्रियेत जनतेचा सक्रिय सहभाग, कर्तव्यभावनेची जोपासना तसेच राज्यघटनेतील नमूद मूल्यांच्या आधारे लोकशाही मजबूत करीत देश महासत्तेकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.कस्तूरचंद पार्क येथे ६९ व्या प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडले. यावेळी विभागीय आयुक्त अनुप कुमार, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे उपस्थित होते.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी जाहीर करण्यात आली. या कर्जमाफीमुळे शेतकºयांचा सातबारा कोरा होत आहे. जिल्ह्यातील ३९ हजार ४४० पात्र लाभार्थी शेतकºयांच्या खात्यात रक्कम जमा झाली असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, महापौर नंदाताई जिचकार, खासदार डॉ. विकास महात्मे, महानगर आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, महानगरपालिका आयुक्त अश्विन मुदगल, माहिती आयुक्त दिलीप धारुरकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे आदी उपस्थित होते.संचलन व समालोचन सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक साळीवकर यांनी केले.विविध पुरस्कारांचे वितरणयावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उत्तम कामगिरी करणाºया पोलीस निरीक्षक सुनील दशरथ महाडिक, सहायक पोलीस उपनिरीक्षक माताप्रसाद रामपाल पांडे, मुख्य गुप्तवार्ता अधिकारी सुनील विष्णुपंत लोखंडे यांचा गौरव करण्यात आला. पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांच्या संकल्पनेतून स्मार्ट पोलीस स्टेशन प्रकल्प राबविण्यात आला. यात प्रथम क्रमांक तहसील पोलीस स्टेशन, द्वितीय सक्करदरा पोलीस स्टेशन, शासकीय इमारतीत असलेल्यांमध्ये प्रथम क्रमांक सोनेगाव पोलीस स्टेशन, द्वितीय अजनी व सीताबर्डी पोलीस स्टेशन यांना देण्यात आला, तर भाडेतत्त्वावरील पोलीस स्टेशनमध्ये प्रथम यशोधरा, द्वितीय वाडी पोलीस स्टेशनला देण्यात आला. चौदाव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा २०१७ मध्ये चाईल्ड वर्ल्ड अबॅकस परीक्षेत प्रथम आल्याबद्दल कुमार मृदुल मोहन घनोटे, साहित्यिक कार्याकरिता प्रसिद्ध कवी अब्दुल बारी आरिफ जमाली यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार नेहरू युवा केंद्र संघटन यांच्यावतीने स्पर्धा जनहिताय बहुउद्देशीय संस्था हुडकेश्वरच्या कपिल कुमार आदमने व चमूला प्रमाणपत्र व रोख २५ हजार रुपये पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यासोबतच इंदिरा गांधी आवास योजनेंतर्गत घरकूल बांधकाम पूर्ण करणाऱ्या  पंचायत समिती रामटेक यांना प्रथम तर द्वितीय कळमेश्वर, तृतीय काटोलच्या गटविकास अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. नागपूर भारत स्काऊट आणि गाईड कार्यालयाच्या वतीने स्काऊट गाईड चळवळीतील राष्ट्रीयस्तरावरील सुवर्णबाण पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने जिल्हा क्रीडा स्पर्धेत पुरस्कारप्राप्त गुणवंत खेळाडूंना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.पथसंचलन व सांस्कृतिक कार्यक्रम ठरले आकर्षणउपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विजय मराठे यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले. पथसंचलनामध्ये उत्कृष्ट ठरलेल्या राष्ट्रीय छात्रसेवा वायुदल यांना प्रथम पुरस्कार, द्वितीय पुरस्कार - प्रहार सैनिकी शाळा मुलींचे पथक तसेच तृतीय पुरस्कारप्राप्त भोसला सैनिक शाळा यांना पालकमंत्री यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. पथसंचलनामध्ये ३४ पथके व विविध विभागांचे चित्ररथ सहभागी झाले.यावेळी विविध शाळा व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, योग प्रात्यक्षिके व रंगारंग कार्यक्रम सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेRepublic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८