शहरं
Join us  
Trending Stories
1
रविंद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? निकाल राखीव ठेवला
2
प्रवाशांनी उड्या मारल्या, आरोपी बॅग घेऊन पळाला अन्... कुर्ला बस अपघाताचा CCTV समोर
3
कुर्ल्यात बसने चिरडलेल्या महिलेच्या हातातून काढल्या सोन्याच्या बांगड्या; पोलिसांकडून शोध सुरु
4
शिंदे गटाला गृह अन् महसूल खाते मिळणार नाही?; अमित शाह-फडणवीसांमध्ये दिल्लीत बैठक
5
Stock Market News: निफ्टीच्या विकली एक्सपायरीवर बाजार सुस्त; सेन्सेक्स-निफ्टी फ्लॅट, मेटल-IT स्टॉक्स मजबूत
6
आणखी भव्यदिव्य होणार शाहरुखचा 'मन्नत' बंगला, कोट्यवधींचा खर्च करुन करणार मोठा बदल
7
तुमची पत्नी ५ स्मार्ट पद्धतीनं वाचवू शकते तुमचा Income Tax! कमाईही करू शकते डबल; म्हणाल 'वाह क्या बात है!'
8
"दोन नात्यात राहणं सोपं नव्हतं, पण..", रीना रॉय आणि पत्नीला एकत्र डेट करत होते शत्रुघ्न सिन्हा, दिली कबुली
9
अंबादास दानवेंचे विरोधीपक्षनेते पद धोक्यात; संख्याबळ समान झाल्याने काँग्रेसला हवे झाले...
10
कुणी महिन्याला ५० हजार कमावतं तर कुणी १ लाख...; 'या' गावातील लोकांचं आयुष्यच बदललं
11
बोअरवेलमध्ये अडकलेल्या ५ वर्षीय आर्यनचा मृत्यू; ५६ तासांनी बाहेर काढल्यानंतर थांबला होता श्वास
12
'आई कुठे काय करते'च्या कलाकारांनी केलं कौमुदीचं केळवण, अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ
13
संपादकीय: धनखड यांच्यावरील विरोधकांचा अविश्वास की इष्टापत्ती?
14
महायुतीचा फॉर्म्युला; सहा आमदारांमागे एक मंत्रिपद; विस्तारासाठी फडणवीस, अजित पवार दिल्लीत
15
आजचे राशीभविष्य - १२ डिसेंबर २०२४: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
16
केजरीवाल धास्तावले?- छावणीत चिंतेचे सावट!
17
परभणी बंदला हिंसक वळण; जमावबंदी लागू; तणाव कायम
18
सातपुड्यात दवांचा बर्फ; तापमान आले ६ अंशांवर; काश्मीरसारख्या थंडीचा अनुभव
19
जामिनासाठी न्यायाधीशाने मागितले पाच लाख; चौघांवर गुन्हा दाखल
20
गुलाब घेऊन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचे स्वागत; राहुल गांधींनी राजनाथ सिंह यांना दिला तिरंगा

परभणीत संविधानाच्या प्रतीकृतीची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

By कमलेश वानखेडे | Published: December 11, 2024 4:16 PM

विजय वडेट्टीवार : हे अधिवेशन फक्त विधेयके मंजुरीसाठी

कमलेश वानखेडे, नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परभणी शहरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यामुळ तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. सदर घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासन आणि पोलीस दलाने तात्काळ योग्य कारवाई करायला हवी होती. मात्र ते न झाल्यामुळे आज परिस्थिती चिघळली आहे. पोलिसांनी संविधानाच्या प्रतीकृतीची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. तसेच सरकारने जनतेला अश्वासित करावे, की या प्रकरणात कोणतीही हयगय केली जाणार नाही, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी नागपुरात केली. संविधान प्रेमी जनतेने देखील शांतता आणि संयम बाळगावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

वडेट्टीवार म्हणाले, हिवाळी अधिवेशन हे फक्त विविध विधेयके मंजूर करण्यासाठी आहे. उत्तर द्यायला कुणी मंत्री नाही. लक्षवेधी येईल आणि सत्ताधारी विरोधकांचा प्रस्ताव होईल. कामकाज सल्लागार समितीची स्थापना झाली आहे. अधिवेशन किमान १० दिवसांचे तरी असानवे, अशी मागणी आम्ही सरकारच्या कानावर पोहचवू, असेही त्यांनी सांगितले. कुणाला मंत्रीपद द्यायचे हा महायुतीचा आंतरिक प्रश्न आहे. भाजपकडे १३७ आमदार आहेत. त्यामळे एकनाथ शिंदे असोत की अजित पवार, हे दिल्लीच्या हायकमांडशिवाय हलणार पण नाही, दयेचा अर्ज करूनच काही मिळवावे लागेल, अशी कोंडी निकालाने केली आहे, असा चिमटा वडेट्टीवार यांनी घेतला.

फडणवीस तयार असतील तरच विरोधी पक्षनेत्याचे नाव देऊआम्ही गटनेता निवडण्याचा प्रस्ताव दिल्लीकडे पाठवलेला आहे. त्यावर दिल्लीत निर्णय घेईल. या आठवड्यात चर्चा करून नाव येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधीपक्ष नेता पद द्यायला तयार आहे का, हे त्यांना विचारून नंतर आम्ही एक नाव ठरवून देऊ. विरोधीपक्ष नेता देणारच नसेल तर आम्ही नाव देणार नाही, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

बॅलेटवरच निवडणुका व्हाव्यातईव्हीएममध्ये घोळ असल्याची लोकांना शंका व विश्वासही आहे. या विरोधात याचिका दाखल करण्यासाठी नेत्यांची चर्चा सुरू आहे. जगात भारत एकमेव देश आहे तो ईव्हीएमवर निवडनूक घेतो. त्यामुळे आपण विश्वास कसा दाखवायचा. या पुढे निवडणुका बॅलेटवर झाली पाहिजे, मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसnagpurनागपूर