लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैद्यकीय व्यवसाय हा एक अतिशय उदात्त व्यवसाय आहे आणि तो खूप प्रतिष्ठित मानला जात आहे, परंतु आज सर्वांकडून डॉक्टरांवर टीका केली जात आहे. आज डॉक्टरांची प्रतिमा खराब केली जात आहे. अलीकडच्या काळात डॉक्टरांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या बऱ्याच घटना घडल्या आहेत. डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबविण्यासाठी कठोर कायदा करण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी येथे व्यक्त केले. नागपूर येथे ‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्ड्स-२०२०’ च्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.डॉ. भोंडवे म्हणाले, लोकमतसारख्या मोठ्या माध्यम समूहाने हा पुरस्कार सुरू केल्याचे पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे. लोकमतने डॉक्टरांच्या कार्याला वेळोवेळी पाठिंबा दर्शविला आहे आणि नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहिले. लोकमत समूहाने विविध उपक्रम आणि आरोग्यसेवा कार्यक्रमांबद्दल जागरूकता निर्माण करण्यास नेहमीच मदत केली आहे. या पुरस्काराने सर्व आरोग्य व्यावसायिकांना तसेच डॉक्टरांना एक उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध झाले आहे आणि समूहाद्वारे नियोजित कोणत्याही आरोग्यविषयक उपक्रमांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) लोकमत समूहाबरोबर कायमच उभे राहील, असे डॉ. भोंडवे यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की, डॉक्टर आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना मान्यता देण्याव्यतिरिक्त लोकमत समूहाने कर्करोग जागरूकता, स्तनाचा कर्करोग जागरूकता, हृदय जागरूकता आणि सर्वांगीण आरोग्यासारख्या विविध गोष्टींवर जनजागृती करण्यात गुंतलेल्या आरोग्य सेवा व्यावसायिकांकडेही पाहिले पाहिजे. अशा प्रकारच्या उपक्रमात लोकमत समूहासोबत भागीदारी करण्यात आयएमएला आनंद होईल. पुढील वर्षापासून या वर्गवारी अंतर्गत पुरस्कार देखील देण्यात यावा, असेही ते म्हणाले.डॉ. भोंडवे म्हणाले की, लोकमत टाइम्स हेल्थकेअर इन एक्सलन्स अवॉर्ड-२०२० सर्व आरोग्य सेवा तसेच वैद्यकीय बंधूचे मनोबल वाढविण्यासाठी निश्चितच प्रगती करेल आणि मला विश्वास आहे की, भविष्यातही समूह असे करीत राहील.
डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबविण्यासाठी कठोर कायदा करावा : डॉ. भोंडवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 9:57 PM