लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
- कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता शहरात कडक निर्बंध ३१ मार्चपर्यंत लागू राहणार असल्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी शनिवारी जारी केले. यापूर्वी १५ मार्च ते २१ मार्च दरम्यान लॉकडाऊनचे आदेश जारी करण्यात आले होते. नवीन आदेशात काही बदल व शिथिलता देण्यात आली आहे.
- या आदेशाची अंमलबजावणी व कारवाई करण्याचे अधिकार मनपाचे उपद्रव शोध व निर्मूलन पथकातील कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी, झोनचे सहायक आयुक्त, त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे मनपा अधिकारी, सर्व संबंधित पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत.
....
हे राहणार बंद
- धार्मिक स्थळे नागरिकांना दर्शनासाठी बंद राहतील. मात्र नियमित पूजाअर्चा ५ लोकांच्या उपस्थितीत करता येईल.
- शहर सीमेतील कोणत्याही धार्मिक व राजकीय सभा, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम.
- शहरातील सभागृह, मंगल कार्यालये, लॉन या ठिकाणी होणारे लग्नसमारंभ.
- शहरातील उद्याने नागरिकांसाठी बंद
- शहरातील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था
(ऑनलाईन कामे सुरू ठेवता येईल. आवश्यक असल्यास २५ टक्के शिक्षक बोलावता येतील.)
- शहरातील सर्व आठवडी बाजार
- जलतरण तलाव, व्यायामशाळा, जिम
- क्रीडा स्पर्धांचे आयोजन
- मॉल्स, चित्रपटगृह, नाट्यगृह
......
हे राहणार सुरू
- शहरातील सर्व खासगी दुकाने दुपारी ४ पर्यंत सुरू.
-रेस्टारंट, हॉटेल, खाद्यगृह ५० टक्के क्षमतेने सायंकाळी ७ पर्यंत. होम डिलिव्हरीसाठी रात्री ११ पर्यंत किचन सुरू ठेवता येईल.
- दूध दुकाने, डेअरी सायंकाळी ७ पर्यंत.
- सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवा (५० टक्के क्षमतेने)
-चारचाकी वाहन १ अधिक २ प्रवासी
- दुचाकी वाहनांवर डबलसीट
- वैद्यकीय सेवा, मेडिकल स्टोअर्स
- निवासाकरिता असलेली हॉटेल्स, लॉज (५० टक्के क्षमतेने)
- वृत्तपत्र, मीडिया संदर्भातील सेवा
- भाजीपाला विक्री व पुरवठा
- पेट्रोल पंप, गॅस एजन्सी
- मालवाहतूक सेवा
- बांधकामे, उद्योग, कारखाने
- बँक, पोस्ट, विमा, विद्युत, शीतगृह
-कृषी उत्पन्न बाजार समिती, महात्मा फुले मार्केट
-सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये (अत्यावश्यक सेवा वगळून) क्षमतेच्या २५ टक्के उपस्थितीत.
- सर्व खासगी आस्थापना कर्मचारी क्षमतेच्या २५ टक्के उपस्थितीत.
-वाचनालये, अभ्यासिका ५० टक्के क्षमतेने.