लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महानगरपालिका क्षेत्रात वाढत असलेली रुग्णसंख्या बघता १५ ते २१ मार्चपर्यंत असणारे कडक निर्बंध आता ३१ मार्चपर्यंत काही अंशात्मक शिथिलीकरणासह कायम राहणार आहेत. आज झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, व्यापारी- उद्योजक- दुकानदार संघटना, माध्यम प्रतिनिधींशी ऑनलाइन चर्चा केल्यानंतर ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी ही घोषणा केली. तसेच नागरिकांना ३१ मार्चपर्यंत गरज नसेल तर घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
या बैठकीला केंद्रीय भुपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन राऊत, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खा. कृपाल तुमाने, महापौर दयाशंकर तिवारी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे, आ. गिरीश व्यास, आ. प्रवीण दटके, आ. अभिजित वंजारी, आ. कृष्णा खोपडे, आ. मोहन मते, आ. राजू पारवे आदी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महापालिका आयुक्त रााधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, मनपाचे अप्पर आयुक्त जलज शर्मा, आयएमएच्या अध्यक्षा डॉ. अर्चना कोठारी, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता अजय केवलिया, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांच्यासह सर्वच विभागातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
नागपूर शहरात लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधाबाबतच्या सूचना दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व व्यापारी प्रतिष्ठान, उद्योजक, नााग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, विविध संघटनेचे प्रतिनिधी तसेच माध्यम प्रतिनिधींनी उपयुक्त सूचना केल्या. बैठकीत नाागपूर शहर व ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या साातत्याने वाढत असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी हे कडक निर्बंध ३१ मार्चपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि काही शिथिलता जाहीर करून अर्थचक्रावर या निर्बंधामुळे बााधा येणार नाही, जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल, असेही बैठकीत ठरविण्यात आले.
चौकट
जिल्ह्यात दररोज ४० हजार लसीकरणाचे उद्दिष्ट, केंद्र संख्या वाढिवणार
जिल्ह्यातील गंभीर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण मोहिमेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यात ६ लाख ८७ हजार लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. यासाठी युद्धस्तरावर लसीकरण मोहीम राबविण्यात येईल. त्यासाठी दररोज ४० हजार लसीकरणाचे लक्ष्य निर्धारित केले आहे. शहरात व ग्रामीण भागात केंद्रांची संख्या वाढविण्यात येईल. तसेच या मोहिमेत सर्व लोकप्रतिनिधींना सामावून घेतले जाईल.
चौकट
केंद्रातर्फे सर्वतोपरी मदत केली जाईल -गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे या बैठकीत ऑनलाइन सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी केंद्र शासनामार्फत कोणतीही मदत लागली तर ती विनाविलंब केल्या जाईल. पालकमंत्री यांच्या पाठीशी संपूर्ण यंत्रणा व सर्व पक्षाचे नेते उभे आहेत, असे सांगितले.
चौकट
ग्रामीण भागात चाचणी केंद्र वाढवा -अनिल देशमुख
यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ग्रामीण भागांमध्ये कोरोना चाचणी केंद्र तातडीने वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच पोलिसांनी नागरिकांवर सक्ती करण्यासोबतच त्यांना आवश्यक कामांसाठी कारण विचारून परवानगी देण्याचेही निर्देश दिले.
चौकट
शासकीय रुग्णालयात आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करा -देवेंद्र फडणवीस
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मेयो व मेडिकल येथील सद्य:स्थितीचा आढावा घेतला. गरीब रुग्णांसाठी आजही शासकीय रुग्णालय महत्त्वपूर्ण असून या ठिकाणी बेडची उपलब्धता व आवश्यक सोयी परिपूर्ण रााहतील याची खातरजमा करण्यास सांगितले.
महत्त्वाचे
केंद्र व राज्य सरकारच्या सर्व परीक्षा कोविड प्रोटोकॉलसह
धार्मिक कार्यक्रम व सभांना बंदी, प्रार्थना स्थळे बंद
गृहविलगीकरणातील रुग्ण फिरताना दिसल्यास क्वारंटाइन सेंटरमध्ये रवानगी
कोरोना अहवालाशी छेडछाड करणाऱ्यांवर कठोर कारवाई
हॉटेल-रेस्टारंट सायंकाळी ७ वाजेपर्यंत, घरपोच सेवा रात्री ११ वाजेपर्यंत
शाळा-महाविद्यालये बंद राहतील
अनावश्यक फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, पोलिसांना निर्देश
सीसीटीव्हीने राहणार नजर
अशाही आल्या सूचना
पॉझिटिव्ह रुग्णांसाठी ट्रांझीट कॅम्प उघडणे
खासगी रुग्णालयातील बिलांवर नियंत्रण ठेवणे
मंगल कार्यालय मालकांना न झालेल्या कार्यक्रमांचे पैसे परत देण्याचे निर्देश देणे
शााळा-महााविद्यालयांतील बसचा लसीकरणासाठी उपयोग करणे
स्पर्धा परीक्षा सुरू असल्याने अभ्यासिका सुरू ठेवणे