शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

गुन्हेगारांवर वार, एका दिवसात ९९ 'तडीपार'; नागपूर पोलिसांचा गुन्हेगारांवर जोरदार हंटर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 4:41 PM

गुन्हेगारीमुक्त व पारदर्शक निवडणुकीसाठी पाऊल : विशेष मोहीम राबवत कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भयमुक्त वातावरणात गुन्हेगारीमुक्त व पारदर्शक निवडणूक पार पडावी यासाठी नागपूर पोलिसांनी शहरातील गुन्हेगारांवर जोरदार हंटर उगारला. विशेष मोहीम राबवत पोलिसांनी ९९ गुन्हेगारांवर एकाच दिवसात तडीपारीची कारवाई केली. हा नागपूर पोलिसांचा अनोखा विक्रमच ठरला असून यामुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे. 

निवडणुकीच्या काळात गुन्हेगार सक्रिय होतात व राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या माध्यमातून प्रभाव दाखविण्याचा प्रयत्न करतात. अनेक जण छुप्या पद्धतीने काम करत असतात. यामुळे गुन्हेगारीचा धोका तर असतोच, शिवाय निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडणे अडचणीचे ठरते. या बाबी लक्षात घेऊन नागपूर पोलिस आयुक्त डॉ . रवींद्रकुमार सिंगल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली व गुन्हेगारांविरोधात विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले. त्याअंतर्गत सर्व पोलिस ठाण्यातील ९९ गुन्हेगारांचा वेगवेगळ्या कालावधीसाठी तडीपार करण्यात आले आहे. काही गुन्हेगार तडीपार झाल्यावर सीमेबाहेर जातात व काही दिवसांनी परत येतात. अशा गुन्हेगारांवर बारीक लक्ष ठेवण्याच्या पोलिस आयुक्तांनी सूचना दिल्या आहेत. जर एखादा गुन्हेगार तडीपार झाल्यावरदेखील शहरात फिरताना आढळला तर त्याच्यावर आणखी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. 

अवैध शस्त्रांवर बारीक नजरनिवडणूक कालावधीत अवैध शस्त्रांवर पोलिसांची बारीक नज़र आहे. शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या १२७ गुन्ह्यांमध्ये १२७ गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. अमली पदार्थ तस्करीच्या ३९ गुन्ह्यांमध्ये ६४ आरोपींना अटक करण्यात आली असून १५.४८ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. तंबाखू आणि गुटखा तस्करीच्या ३९ गुन्ह्यांमध्ये ६४ आरोपींना अटक करण्यात आली असून ३८ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या कालावधीत ४५.४६ लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांची मतदानाबाबतदेखील जनजागृती एकीकडे पोलिस गुन्हेगारांवर हेटर फिरवत असताना दुसरीकडे नागरिकांना २ मतदानासाठी प्रवृत्त करत आहेत. त्यांनी मतदानासाठी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत पोलिस आयुक्तांच्या पुढाकाराने व चित्रकला महाविद्यालयाच्या सहकार्याने सिव्हिल लाइन्सच्या चिंटणवीस सेंटर येथे ९ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देशातील प्रसिद्ध चित्रकार सहभागी होत आहेत. नागरिकांनी मतदान करण्याचे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी केले आहे.

१,६७२ जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई आदर्श आचारसंहिता लागू आल्यानंतर पोलिस कमालीचे सक्रिय झाले आहेत. विविध माध्यमांतून गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात येत आहे. आतापर्यंत १ हजार ६७२ जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, तर ५२० जणांना अजामीनपात्र वॉरंट बजाविण्यात आले आहे. एमपीडीएअंतर्गत सात गुन्हेगारांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. अवैध दारू विकण्यासंदर्भात ४९० गुन्हे दाखल करत ५२८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ११.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४