शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
2
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
3
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
5
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
6
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
7
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
8
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
9
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
11
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
12
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
13
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
14
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
15
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
16
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
17
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
18
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
19
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
20
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...

दहावी आणि बारावीच्या निकालासाठी धडपड सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 8:44 PM

कोरोनाच्या संक्रमणामुळे शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याचा परिणाम दहावी आणि बारावीच्या निकालावर पडतो आहे. शिक्षकांना उत्तर पत्रिका ने-आण करण्यात अडचण जात आहे. या कामासाठी शिथिलता देण्यात यावी, म्हणून नागपूर बोर्डाच्या सचिवांनी सहाही विभागातील जिल्हाधिकारी व नागपूर व चंद्रपूर महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून विनंती केली आहे.

ठळक मुद्देबोर्डाचे महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या संक्रमणामुळे शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याचा परिणाम दहावी आणि बारावीच्या निकालावर पडतो आहे. शिक्षकांना उत्तर पत्रिका ने-आण करण्यात अडचण जात आहे. या कामासाठी शिथिलता देण्यात यावी, म्हणून नागपूर बोर्डाच्या सचिवांनी सहाही विभागातील जिल्हाधिकारी व नागपूर व चंद्रपूर महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून विनंती केली आहे. दहावी व बारावीचा निकाल १० जून पूर्वी घोषित करणे आवश्यक आहे. पण लॉकडाऊनमुळे अजूनही तपासलेल्या उत्तरपत्रिका बोर्डाकडे आलेल्या नाही. बोर्डाच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सूट अथवा प्रवासाकरिता परवानगी पास देण्यात यावा, अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे. उत्तरपत्रिका परीक्षा केंद्रावरून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात पाठविणे, शिक्षक अथवा शिपायांमार्फत उत्तर पत्रिका शाळेतून परीक्षकांच्या घरी घेऊन जाणे, परीक्षकांकडून नियामकाकडे उत्तर पत्रिका पोहचविणे. नियामकाकडील उत्तर पत्रिका विभागीय मंडळाकडे जमा करणे तसेच परीक्षेतील गैरमार्ग प्रकरणी चौकशी करण्याकरिता परीक्षा मंडळाच्या नियुक्ती अधिकाऱ्यांना प्रवास करण्यास परवानगी देणे, या मागण्या पत्राद्वारे करण्यात आल्या आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालnagpurनागपूर