शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

उदबत्तीच्या सुगंधासाठी बांबू उत्पादनाची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 10:41 AM

Bambu Nagpur News देशाच्या आयात-निर्यात धोरणामध्ये सुधारणा करण्यासोबतच देशातच उत्पादकता वाढविण्याचा प्रयत्न होत आहे.

ठळक मुद्देगरज मात्र ७ हजार मे. टनाचीदेशात उत्पादन फक्त १५० मे. टन

गोपालकृष्ण मांडवकरलोकमत विशेषनागपूर - देशामध्ये उदबत्तीच्या वापरासाठी उपयोगात येणाऱ्या बांबूची मागणी आणि वापरही भरपूर आहे. असे असले तरी देशातील उत्पादन फक्त १५० मेट्रिक टन आहे. त्यातुलनेत मागणी मात्र ६ ते ७ हजार मेट्रिक टनाची आहे. मागणी अधिक आणि उत्पादन कमी या असंतुलनामुळे देशात बांबू आयात करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून यासाठी उपयुक्त बांबूचे उत्पादन देशातच वाढविण्याचा प्रयोग सरकारने हाती घेतला आहे.महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या माध्यमातून सध्या राष्ट्रीय बांबू मिशन योजना राबविली जात आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहित केले जात असून, उपयुक्त असलेल्या प्रजातीही उपलब्ध करून दिल्या जात आहेत. देशातील उदबत्तीच्या बांबूची गरज भागविण्यासाठी आजवर चीन आणि व्हिएतनाममधून बांबूची आयात केली जायची. मात्र आता भारताचे संबंध चीनसोबत बरेच ताणले गेले आहे.

देशाच्या आयात-निर्यात धोरणामध्ये सुधारणा करण्यासोबतच देशातच उत्पादकता वाढविण्याचा प्रयत्न होत आहे. याचाच भाग म्हणून अगरबत्तीसाठी उपयोगात येणाऱ्या बांबूच्या उत्पादनवाढीसाठी टुल्डा या प्रजातीचा बांबू देशातच विकसित केला जात आहे. या बांबूचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या दोन पेरा यामध्ये अंतर जवळपास एक फुटाचे असते. तसेच तो नरमही असतो. त्यामुळे अगरबत्तीच्या निर्मितीसाठी तो अधिक सोईचा ठरतो. विशेष म्हणजे, हा बांबू चीन आणि व्हिएतनाम या देशांमध्येच मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे त्यावर संशोधन करून टिश्यू कल्चरच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर या प्रजातीच्या बांबूच्या रोपांची निर्मिती केली जात आहे. विदभार्तील वातावरणात या बांबूचे पीक चांगल्या प्रकारे घेता येणार आहे.महाराष्ट्र बांबू विकास मिशनने यासाठी पुढाकार घेतला असून, राज्यात वाहतुकीच्या दृष्टीने जवळ पडतील अशा सात उत्पादकांना अधिकृत पुरवठादार म्हणून जाहीर केले आहे. त्यांच्या रोपांचे दरही निश्चित करण्यात आले आहेत. राष्ट्रीय बांबू मिशनअंतर्गत जुलै-२०२० पासून या माध्यमातून या आठ प्रकारच्या बांबूच्या कलमा शेतक?्यांना पुरविण्यात आल्या आहेत. त्यात टुल्डाचाही समावेश आहे. पुढील तीन वर्षांनंतर त्याचे उत्पादन हाती येणार आहे.- टी.एस.के. रेड्डी, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, नागपूर

टॅग्स :Bambu Gardenबांबू गार्डन