शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
2
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
3
IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?
4
"दिवाळीपूर्वी बंगालमध्ये दंगली आणि बॉम्बस्फोटाचा कट", मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा मोठा दावा
5
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
6
एका महिन्यात 30 लाख नवीन ग्राहक! BSNL ची कमाल;  Airtel, Vodafone आणि Jio ची  अवस्था वाईट!
7
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार
8
'दरवेळी ऑफर देतात'; बाळासाहेब थोरात-संजय राऊतांबद्दल देशमुखांचा गौप्यस्फोट
9
कडक सॅल्यूट! हातावरच्या रेषा नशीब ठरवत नाहीत...; डिलिव्हरी बॉयचा डोळे पाणावणारा Video
10
ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाचा उदय; २८८ जागा लढवणार, काय आहे नाव?
11
मी ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का? मनूची पोस्ट; चाहत्यांनी उडवली खिल्ली मग...
12
अमित ठाकरेंसाठी सदा सरवणकर माघार घेणार? शेलारांच्या मागणीनंतर उदय सामंतांचे महत्वाचे वक्तव्य
13
जयश्री थोरातांवरील आक्षेपार्ह वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुजय विखेंचे ढोंग...
14
छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे
15
Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसने विद्यमान आमदाराचाच पत्ता केला कट; लहू कानडेंना मोठा झटका!
16
"पप्पांनी आयुष्यभराची कमाई माझ्या लग्नावर खर्च केली, अजूनही फेडताहेत कर्ज"
17
कोण करणार करेक्ट कार्यक्रम? १५ मतदारसंघात पवार विरुद्ध पवार थेट लढत; काका-पुतणे आमनेसामने
18
Nvidia vs Apple: 'या' कंपनीनं Apple ला टाकलं मागे, भारतातही केलीये मोठी डील; काय करते कंपनी?
19
छगन भुजबळांविरोधात येवल्यातून कोण लढणार?; मविआतील 'या' नेत्यांची नावे चर्चेत
20
Jayashree Thorat: वसंतराव देशमुखांविरोधात गुन्हा; रुपाली चाकणकर म्हणाल्या, 'असं बोलणं खपवून घेणार नाही'

आरोप-प्रत्यारोपांच्या धुराळ्यात पार पडली एसटीच्या बँकेची निवडणूक; जिल्ह्यात ८४:७४ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2023 8:34 PM

Nagpur News चार हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या एसटी महामंडळ को-ऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक आज पार पडली. तब्बल सात वर्षानंतर झालेल्या या निवडणूकीच्या मतदानात मतदारांचा जोरदार उत्साह बघायला मिळाला.

नागपूर : चार हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या एसटी महामंडळ को-ऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक आज पार पडली. तब्बल सात वर्षानंतर झालेल्या या निवडणूकीच्या मतदानात मतदारांचा जोरदार उत्साह बघायला मिळाला. नागपूर जिल्ह्यात तब्बल ८४.७४ टक्के मतदारांनी मतदान केले.

चार हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या या बँकेचे १९ जणांचे संचालक मंडळ आहे. त्यात १४ जण सर्वसाधारण गटातून, तर पाच संचालक राखीव गटाचे आहेत. संचालक मंडळाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असला तरी कोरोनामुळे तसेच विविध कारणांमुळे दोन वर्षे ही निवडणूक लांबली. आता २०१६ नंतर तब्बल सात वर्षांनी ही निवडणूक पार पडली. एकूणच उलाढाल बघता बँकेच्या तिजोरीची अर्थात सत्तेची चावी आपल्याकडे असावी, यासाठी विविध पॅनल्सनी जोर लावला होता. त्यासाठी पाच प्रमुख पॅनलसह एकूण १४३ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उभे ठाकले होते.

प्रत्येकाने आपापल्या परीने संपर्क साधून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न केले. दावे-प्रतिदावे आणि आरोप-प्रत्यारोपही झाले. अशा स्थितीत ही निवडणूक आज पार पडली. नागपूर शहरातील पाच, हिंगणा वर्कशॉप एक आणि उमरेड, काटोल, रामटेक तसेच सावनेर प्रत्येकी एक अशा एकूण १० केंद्रावर आज मतदान पार पडले. जिल्ह्यात तब्बल ८४.७४ टक्के मतदारांनी मतदानाच हक्क बजावला. त्यावरून या निवडणूकीविषयी बँकेच्या मतदारांमध्ये किती उत्साह होता, याची प्रचिती यावी. निवडणूक अधिकारी नितीन काळे तर क्षेत्रीय अधिकारी जयंत पालटकर यांनी आज निवडणूकीच्या मतदानाची प्रक्रिया आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पार पाडली. मतदानाच्या वेळी कसलीही गडबड, गोंधळ झाला नसल्याचे पालटकर यांनी लोकमतला सांगितले.---

टॅग्स :state transportएसटीElectionनिवडणूक