शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
3
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
4
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
5
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
6
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
7
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
8
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
9
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
10
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
11
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
12
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
13
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
14
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
15
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
16
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
17
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
18
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
19
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
20
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान

जाचक अटीत अडकल्या विहिरी

By admin | Published: February 22, 2017 2:50 AM

शेतकऱ्यांना सिंचनाची साधने उपलब्ध व्हावीत, त्यातून त्यांना सुबत्ता यावी, या उदात्त हेतूने राज्य शासन

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना : अनेक शेतकरी लाभापासून वंचित काटोल : शेतकऱ्यांना सिंचनाची साधने उपलब्ध व्हावीत, त्यातून त्यांना सुबत्ता यावी, या उदात्त हेतूने राज्य शासन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहिरींच्या खोदकाम व बांधकामासाठी अनुदान देते. मात्र, शासनानेच घालून दिलेल्या काही जाचक अटींमुळे अनेक पात्र शेतकऱ्यांना या विहिरी मिळाल्या नाहीत. त्यामुळे राज्य शासनाने या जाचक अटी शिथिल कराव्यात, अशी मागणी पंचायत समिती सभापती संदीप सरोदे यांनी केली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, द्रारिद्र्य रेषेखालील शेतकरी, भू सुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, कृषी कर्जमाफी योजना २००८ नुसार अल्पभूधारक व सीमांत शेतकरी आणि अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता) अधिनियम २००६ नुसार पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना या विहिरींचा लाभ मिळू शकतो. यासाठी लाभार्थ्याकडे किमान ०.६० हेक्टर आर शेती असणे आवश्यक असून, प्रस्तावित विहीर पूर्वी अस्तित्वात असलेल्या विहिरीपासून ५०० फूट अंतरावर असावी, प्रस्तावित विहिरीपासून पाच पोलच्या आत वीजपुरवठा उपलब्ध असावा, लाभार्थ्याकडे तलाठ्याच्या स्वाक्षरीचा एकूण शेतीक्षेत्राचा दाखला असावा, एकापेक्षा अधिक लाभार्थी संयुक्त विहीर घेत असल्यास त्यांचे एकूण शेतीचे क्षेत्र ०.६० हेक्टरपेक्षा जास्त व सलग असावे, लाभार्थी हा जॉबकार्डधारक असला पाहिजे, त्याने मजूर म्हणून काम करणे आवश्यक आहे, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र लाभार्थ्याकडे असावे आदी अटी पूर्वी घालण्यात आल्या होत्या. या योजनेच्या लाभासाठी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित ग्रामपंचायतमध्ये लाभार्थ्यांची निवड करून अर्ज पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविले जातात. सर्व अटी व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्यांना समितीच्यावतीने विहिरी मंजूर केल्या जातात. दरम्यान, शासनाने यातील काही अटींमध्ये बदल करून २१ आॅगस्ट २०१४ रोजी नवीन आदेश जारी केला. नवीन आदेशान्वये दोन विहिरीमधील अंतर किमान १५० मीटर असावे, अशी नवीन अट घालण्यात आली. ही अट केवळ अल्पभूधारक शेतकरी लाभार्थ्यांना लागू केली आहे. या अटी केंद्राने घातल्या आहेत. वास्तवात, अल्पभूधारक अर्थात शेतीचा विचार केल्यास दोन शेतांमधील व त्यातीन विहिरीमधील अंतर कमी असणे स्वाभाविक असल्याने अंतराची अट ही जाचक ठरत आहे. (तालुका प्रतिनिधी)