शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

विद्यार्थ्याला मारहाण : अखेर संस्थाचालकाच्या मुलावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 1:40 AM

विद्यार्थ्यांनी केलेल्या खोडीवरून शिक्षकांनी नव्हे तर संस्थाचालकाच्या मुलाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी शिक्षण विभागाने केलेल्या चौकशीनंतर सोमवारी कामठी पोलीस ठाण्यात संस्थाचालकाच्या मुलावर बाल हक्क अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनागपूरच्या इंडियन आॅलिम्पियाड स्कूलमधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्यार्थ्यांनी केलेल्या खोडीवरून शिक्षकांनी नव्हे तर संस्थाचालकाच्या मुलाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी शिक्षण विभागाने केलेल्या चौकशीनंतर सोमवारी कामठी पोलीस ठाण्यात संस्थाचालकाच्या मुलावर बाल हक्क अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना भिलगाव येथील इंडियन आॅलिम्पियाड स्कूलमधील आहे. ११ आॅक्टोबर रोजी संस्थाचालकाचा मुलगा दानिश खान याने ९ व्या वर्गात शिकणाऱ्या मिर्झा आसिफ बेग याला संस्थाचालक व प्राचार्यापुढे बेदम मारहाण केली होती. यासंदर्भात दानिश खान याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आरटीई अ‍ॅक्शन कमिटीचे अध्यक्ष शाहीद शरीफ यांनी शिक्षण विभागाकडे केली होती. या प्रकरणाची गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती कामठी, केंद्रप्रमुख पं.स. कामठी, शिक्षण विस्तार अधिकारी रेखा चुंगडे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांच्याकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीत विद्यार्थी व प्राचार्य यांच्या बयानावरून विद्यार्थ्याला मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले. प्राचार्य यांनी आपल्या बयानात या शाळेत मी केवळ सही करण्यापुरता प्राचार्य आहे, असे स्पष्ट केले. या चौकशीत ही शाळा आरटीई अ‍ॅक्टच्या नियमांचे व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत नसल्याचे स्पष्ट झाले. चौकशी अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात या प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार देणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार १२ नोव्हेंबर रोजी कामठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून दानिश खान याच्यावर बाल हक्क अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थी